अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा हनिमूनचा फोटो तुम्ही पाहिला का?

मनोरंजन

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा हनिमूनचा फोटो अनुष्काने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत ते दोघे खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोतील अनुष्काच्या हातावरची मेहेंदी आणि तिची अंगठी विशेष लक्ष वेधून घेत आहे.

अनुष्का शर्माने रब ने बना दी जोडी या चित्रपटापासून तिच्या करियरला सुरुवात केली. तिने तिच्या कारकिर्दीत पीके, सुलतान, बँड बाजा बरात, जब तक है जान, लेडिज व्हर्सेस रिकी बहल, एनएच १०, दिल धडकन दो यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. अनुष्का आणि विराटची ओळख २०१३ ला एका जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती आणि त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. गेल्या चार वर्षांपासून त्यांचे अफेअर सुरू असून त्यांनी नुकतेच इटलीत लग्न केले.
अनुष्का आणि विराट आता लग्नानंतर कुठे फिरायला जाणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. ते हनिमूनसाठी रोमला जाणार असल्याचे म्हटले जात होते. अनुष्काने नुकताच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर एक फोटो शेअर करून अनुष्का आणि विराट हनिमूनसाठी कुठे गेले आहेत हे त्यांच्या चाहत्यांना सांगितले आहे. अनुष्काने विराटसोबतचा एक फोटो शेअर केला आहे यावरून ते दोघे एखाद्या बर्फाच्छादित परिसरात फिरत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. या फोटोत अनुष्का आणि विराट खूपच छान दिसत आहेत. अनुष्का आणि विराट युरोपमध्ये असावेत असा यावरून अंदाज लावला जात आहे. अनुष्का आणि विराट या फोटोत खूपच सुंदर दिसत आहेत. या फोटोतील अनुष्काच्या हातावरची मेहेंदी आणि तिची अंगठी विशेष लक्ष वेधून घेत आहे. या फोटोसोबत तिने मला खरंच स्वर्गात असल्यासारखे वाटत आहे असे कॅप्शन लिहिले आहे. हा फोटो अनेकांनी लाइक केला असून त्यावर अनेक प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. तुम्ही एकत्र खूप छान दिसत आहात, तुम्ही इतके सुंदर दिसत आहात की मागचा बॅकराऊंडदेखील फिका पडत आहे अशा प्रतिक्रिया अनुष्का आणि विराटच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी इटलीमध्ये लग्न करत त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. ११ नोव्हेंबरला अनुष्का आणि विराट यांनी लग्नगाठ बांधली. यानंतर या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. इटलीतल्या टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो Borgo Finocchieto या रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाचे रिसेप्शन दिल्लीत २१ तारखेला विराटच्या कुटुंबियांसाठी आणि जवळच्या मित्रमैत्रिणींसाठी होणार असून अनुष्का आणि विराटच्या बॉलिवूडमधील आणि क्रिकेट क्षेेत्रातील मित्र मैत्रिणींसाठी २६ तारखेला मुंबईत रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. रिसेप्शन नंतर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विराट आणि अनुष्का साऊथ आफ्रिकेला रवाना होणार आहेत. तसेच डिसेंबर महिन्यात मुंबईतील वरळी येथील घरात ते गृहप्रवेश करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *