Breaking

कासोदा येथील प्रगती बहूउद्देशिय संस्थेने केला पत्रकार दिवस उत्साहात साजरा

0

कासोदा(राहुल मराठे) येथील प्रगती बहूउद्देशिय संस्थेच्या वतीने ६ जानेवारी पत्रकार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
सविस्तर असे की , ६ जानेवारी हा दिवस भारताचे पहिले पत्रकार तथा दर्पण वृत्तपत्राचे संपादक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मतिथी निमित्ताने साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून येथील प्रगती बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष – प्रविण बाविस्कर यांनी गावातील सर्व पत्रकार , संपादक यांना स्वामी समर्थ केंद्राच्या आवारात एकत्रित बोलवून , आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार प्रमोद पाटील हे होते.कार्यक्रमा प्रसंगी जेष्ठ पत्रकार यु.टी. महाजन सर , पत्रकार प्रमोद पाटील चिलानेकर , पत्रकार जितेंद्र ठाकरे , पत्रकार राहुल मराठे , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सागर शेलार , पत्रकार भाऊसाहेब पाटील , पत्रकार शैलेश मंत्री , पत्रकार दिपक शिंपी , पत्रकार योगेश चौधरी , शिवसेना उप ता.प्रमुख रविंद्र चौधरी , निलेश अग्रवाल, भैरवलाल पांडे , प्रगती संस्थेचे पदाधिकारी गावातील पत्रकार व आदी ग्रामस्थ उपस्थित होते. त्याप्रसंगी पत्रकारांना एकत्रित बोलावून प्रगती बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा आर.पी.आय. चे ता.अध्यक्ष प्रविण बाविस्कर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तर सर्वांना पेन व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा भेट दिली.पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे , तो आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात होणाऱ्या अन्यायाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो. वर्षाचे ३६५ दिवस रात्रंदिवस तो आपल्या वृत्तपत्रासाठी बातम्यांचे संकलन करत असतो.समाजातील एक घटक म्हणून गावातील ग्रामपंचायत , पोलीस स्टेशन व समाजातील काही राजकीय पुढारी अशा लोकांनी हा पत्रकार दिवस साजरा करायला हवा पण , आपल्या गावासाठी एक खेदाची बाब आहे कि , एखादी चांगली किंवा वाईट बातमी लावायची कां नाही ? या विषयी ते पत्रकारांपर्यंत पोहचू शकतात. पण वर्षातून एक दिवस त्यांच्यासाठी हा पत्रकार दिवस साजरा कां करू शकत नाही याची खंत वाटते. पोलीस आणि पत्रकार हे दोघं एकाच नान्याच्या दोन बाजू आहेत.जिल्हाभरात पत्रकार दिवस प्रत्येक ग्रामपंचायत व पोलीस स्टेशन मध्ये साजरा करण्यात आला. तरी देखील कासोदा ग्रामपंचायत व पोलीस स्टेशनकडून कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमाचे नियोजन केले गेले नाही. यांची खंत यावेळी पत्रकारांनी व्यक्त केली विचार करून गावातील पत्रकार बंधूंनी आप आपसातले मतभेद सोडून गावातील सर्व ज्येष्ट श्रेष्ठ पत्रकारांनी एकत्रीत येणे म्हणत्वाचे असुन योग्य वेळी कोणाचीही भिडभाड न ठेवता आपल्या लेखणीची ताकद दाखवणे गरजेचे आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here