Breaking

कासोद्यात चोरीचे सत्र सुरूच – शाळेच्या सहलींमुळे चोरांचा डाव फसला

0

कासोदा ब्युरो चिफ राहुल मराठे- येथील सराफ व्यापारी केशवशेठ भामरे यांच्या जिल्हा बँक जवळील रविराज फोटो च्या शेजारील दिपा ज्वेलर्स येथे रात्री पावणे चार च्या सुमारास दरोडा टाकण्यासाठी सफेद कार नंबर ८२९३ मधून आलेल्या चोरांचा डाव फसला. दि. ८
जानेवारी बुधवारी रोजी
पहाटे चारला एका सराफी दुकानात चोरट्यांनी धाडशी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्रभर जागणाऱ्या होमगार्ड व पो.कॉ . समाधान भागवत कासोदा पोलीस स्टेशन च्या कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने हा प्रयत्न फसला आहे.

दि.७ रोजी कासोदा बाजार होता. दिवसभराचे कामकाज आटोपून सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वासुदेव सोनार यांनी दुकान बंद केले व घरी गेले. या दुकानाशेजारी वास्तव्य कमी व दुकाने जास्त असल्याने रात्री हा परिसर सामसूम असतो. शेजारी जिल्हा बँकेची शाखादेखील आहे. पण कर्मचारी कामकाज आटोपून घरी निघून जातात. या परिसराची आधी रेकी करण्यात आली असावी व नेमका हा चौक चोरट्यांनी निवडला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.
दि.७ च्या रात्री आठ होमगार्ड गावात बंदोबस्ताला होते. व पोलीस गाडी परिसरात गस्ती वर होती दोन पोलीस गाडीसोबत असे १० होमगार्ड कर्तव्य बजावत होते. पहाटे चारला कर्तव्यावर असलेले सर्व होमगार्ड बिर्ला चौकात एकत्र आले. दररोजसारखा एकत्रित फोटो काढून पोलीस खात्याच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केला. पहाटे साडेचार-पाचला लोक जागे झाल्यावर घरी जाण्याच्या तयारीत असताना शाळेच्या सहलीची बस गावात आली. त्या दरम्यान भडगावकडून एक चारचाकी गाडी गावात येताना होमगार्ड यांना दिसली. पण ती चारचाकी गाडी विद्यार्थ्यांची गर्दी पाहून थबकली व परत जाताना दिसली. ही गाडी परत का गेली या शंकेमुळे गावात कर्तव्यावर असलेले सर्व होमगार्ड व पोलीस कॉ .समाधान भागवत यांनी गावातील प्रमुख रस्त्यावर धाव घेत ही गाडी केशव सोनार या सराफाच्या दुकानाजवळ थांबली. तिच्यातून दोन दरोडेखोर उतरले. त्यांच्या जवळच्या मोठ्या कटरने एका शटरची लॉकपट्टी (कान) कापले. दुसऱ्या बाजूची लॉकपट्टी कापत असताना बाळू जाधव होमगार्ड व पोलीस गाडी चालक या रस्त्याने धावले. मोटारसायकलचा व पोलिस गाडीचा लाईट चमकताना दिसताच हे दरोडेखोर पटापट गाडीत बसले. गाडी सुरुच होती. ती सुसाट वेगाने जगदंबा माता मंदिराच्या दिशेने पळाली. होमगार्ड व पोलिस गाडी या कारच्या दिशेने जोरजोरात चोर-चोर आरोळ्या मारत मागे धावली . पुढे मन्यार मशीद चौकात आनंद विसपुते व इस्त्याक अली यांनी ही गाडी अडवायचा प्रयत्न केला. मात्र हे दरोडेखोर भडगावच्या दिशेने पसार होण्यात यशस्वी झाले आहेत.
पोलिसांनी घेतली बैठक
दरम्यान, पोलिसांनी बुधवारी सायंकाळी गावातील व्यापारी व प्रतिष्ठित नागरिकांची बैठक बोलावून याबाबत नागरिकांची मत जाणून घेऊन मौलिक सूचना केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी स्वामी समर्थ मंदिर, संजय येवले, सुनील झंवर, किशोर गुजराती, पिरन शेख, ईश्वर पाटील, जगदंब पटेल, मनोज पिंगळे या व्यापर्यांकडे चोरी झाली आहे. पांडेनगर भागात नुकतीच गाय चोरीला गेली आहे. पण या चोरट्यांचा शोध न लागल्याने गावकऱ्यात या धाडशी चोरीमुळे दहशत पसरली आहे.
सपोनि रवींद्र जाधव व सहकऱ्यांनी बुधवारी सराफाच्या दुकानात भेट देऊन सीसीटीव्ही लावणे व इतर सूचना केल्या आहेत. पण श्वानपथक किंवा नाकेबंदी किंवा दरवाजावरील ठसे वगैरे न घेतल्याने या प्रकाराचे गांभीर्य पोलिसांना आहे की नाही याबाबत जनतेतून चर्चा होत आहेत.
कासोद्यातून भडगाव, पाचोरा, पारोळा, एरंडोल या दिशेने जाणारे मार्ग आहेत. या गाडीचा नंबर ८२९३ आहे. या सर्व मार्गाने त्वरित नाकाबंदी केली गेली असती तर कदाचित हे दरोडेखोर सापडले असते, अशी जाणकारात चर्चा होत आहे.

*दिवसभर व्यवसाय आटोपल्यावर तिजोरी मध्ये दागिने ठेवतो. शटरला दोन मोठे कुलूप, सेंटरलॉक आहे. नंतर चॅनल गेटदेखील आहे. एवढी काळजी आम्ही घेतो. पोलिसांची गस्त असते. तरीदेखील दरोडेखोर हा प्रयत्न करतात. याचे आश्चर्य आहे. ◆केशव सोनार, कासोदा*◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here