Breaking

*वाळु माफिया बिनधास्त – दिवसा ढवळ्या होतेय चोरी – महसुल&पोलीस प्रशासनाची मिलीभगत -(कासोदा ब्युरो चिफ राहुल मराठे यास कडून)        

0

कासोदा शहरासह एरंडोल तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाळू माफियांचा हैदोस मांडला असून बिनधास्तपणे वाळू चोरी होत आहे . महसूल प्रशासन रात्री डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावत असल्याचे दिसत असले . तरी दिवसा मात्र त्याच डोळ्यावर पट्टी ठेवून काम करीत असल्याचे चित्र आहे. केवळ कासोद्यातच नव्हे , तर संपूर्ण एरंडोल तालुका परिसरात देखील दिवसा वाळू चोरी केली जात आहे .

जळगाव जिल्हा वाळू माफिया मुळे चर्चेत राहिलेला आहे .
त्यात एरंडोल तालुका परिसराचे मोलाचे योगदान लाभते असे म्हणण्यास हरकत नाही.

वाळू चोरीच्या प्रकारामुळे अनेकांना दंड झाले तर काही वर गुन्हे दाखल करण्यात आले इतकेच काय तर काहिंवर विशेष कारवाई देखील झाली आहे , परंतु प्रशासन काहीही करीत असले तरी वाळू माफियांचे चोरीचे धंदे मात्र सुरूच आहे . मी स्वतः पत्रकार या नात्याने महसूल प्रशासनास लेखी निवेदने व भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून कळविले असून अद्यापही वाळूचोरी थांबवत नाही. व कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली दिसून येत नाही. यात महसूल प्रशासनाची मिलीभगत आहे का ? असा एरंडोल परिसरातील नागरिकांना प्रश्न उपस्थित होत आहे . शेकडो वाळू चोर दररोज नदीपात्राची चाळणी करीत असताना देखील जिल्हाधिकारी , प्रांताधिकारी , तहसीलदार , मंडळ अधिकारी , व एरंडोल तालुक्यातील तलाठी बसल्याजागी चुप्प कसे राहू शकतात , असा प्रश्न उपस्थित होत आहे. महसूल विभागाची मिलीभगत असल्याशिवाय वाळूमाफिया बिनधास्तपणे वाळू चोरी करणे शक्यच नाही. याकडे सर्वत्र दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here