StarPower !! ​भारतात येतेयं प्रियांका चोप्रा… मिळणार १ मिनिटाचे १ कोटी!

मनोरंजन

देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. पण येत्या १८ डिसेंबरला प्रियांका भारतात येत आहे.

देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. पण येत्या १८ डिसेंबरला प्रियांका भारतात येत आहे. या भारत भेटीत प्रियांका बॉलिवूड प्रोजेक्टवर चर्चा करून काही चित्रपट साईन करू शकते अशी चर्चा आहे. या चर्चेत किती तथ्य आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. पण हो, प्रियांका भारतात येण्यामागचे एक ठोस कारण मात्र आम्हाला सापडलेय. होय, हे कारण म्हणजे, झी सिने अवार्ड. होय, या महिन्याच्या अखेरिस होणा-या या अवार्ड्स इव्हेंटमध्ये प्रियांका परफॉर्म करणार आहे. याच अवार्ड नाईटबद्दल आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे, या अवार्ड नाईटसाठी पिगी चॉप्सने मोठी रक्कम वसूल केली आहे. थोडी थोडकी नाही तर दर मिनिटाला एक कोटी रुपए इतकी भरमसाठ.
होय, सूत्रांनी दिलेली बातमी खरी मानाल तर प्रियांका या अवार्ड नाईटमध्ये पाच मिनिटांचा परफॉर्मन्स देणार आहे. या पाच मिनिटांच्या परफॉर्मन्साठी तिला ५ कोटी रूपयांची रक्कम दिली जाणार आहे. म्हणजे प्रत्येक मिनिटासाठी १ कोटी रुपए.
प्रियांकाचे भाव सध्या चांगलेच वधारले आहेत. इंटरनॅशनल स्टार म्हणून ओळखली जात असल्याने तिची प्रचंड डिमांड आहे. त्यामुळेच आयोजकांनी तिच्या टीमसोबत फार मोल-भाव करण्याचा प्रश्नच नव्हता. अवार्ड शोमध्ये प्रियांकाचा परफॉर्मन्स हायलाईट करण्याचा आयोजकांचा इरादा आहे. यावेळी पीसी तिच्याच सुपरहिट गाण्यांवर थिरकताना दिसेल. या इव्हेंटमध्ये प्रियांका स्टेजवर उतलीच तर हा तिचा भारतातील दोन वर्षानंतरचा पहिला परफॉर्मन्स असेल. २०१६ मध्ये प्रोड्यूसर गिल्ड अवार्डमध्ये प्रियांकाने अखेरचा परफॉर्मन्स दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *