Breaking

भडगाव भाजप तालुकाध्यक्ष पदी अमोल पाटील (भडगाव सागर महाजन ध्येय न्युज ब्युरो चिफ यास कडून)

0

भडगाव तालुक्याच्या भाजपा अध्यक्ष पदी अमोल नाना पाटील यांची निवड जळगाव जिल्हा सहाय्यक निवडणुक अधिकारी डॉ. विजय धांडे यांनी घोषित केली आहे.
याबाबत जळगाव जिल्हा भाजपा कोअर समितीच्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय करण्यात आला. बैठकीला माजी मंत्री गिरीषभाऊ महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, विभाग संघटनमंत्री अॅड. किशोरभाऊ काळकर, खा. उन्मेष दादा पाटील, खा. रक्षाताई खडसे,, बेटी बचाओ बेटी पढाओ राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, प्रदेश उपाध्यक्ष अशोकभाऊ, कांडेलकर, प्रदेश चिटणीस आ. श्रीमती स्मिताताई वाघ, आ. संजय सावकारे, आ. राजूमामा भोळे, आ. चंदूलाल पटेल,आ. मंगेशदादा चव्हाण, विद्यमान जिल्हाध्यक्ष मा. आ.हरिभाऊ जावळे, तत्कालिन जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ. सुनिल नेवे, सरचिटणीस पोपटतात्या भोळे, सदाशिवआबा पाटील, अॅड. रोहिणीताई खडसे -खेवलकर, हर्षल पाटील इ.उपस्थित होते..
अमोल पाटील यांच्या निवडीबद्दल कोअर समितीच्या सर्व मान्यवरांनी तसेच भडगाव तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, व लोकप्रतिनिधींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here