Breaking

पाचोरा पिपल्स बँकेचे उद्या 12 जानेवारी रविवारी रोजी मतदान

0

पाचोरा – पाचोरा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेची 12 जानेवारी रविवार रोजी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीचा प्रचार थंडावला असून दोन पॅनलमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र आहे . बँकेच्या या निवडणुकीत एकूण 15 जागांसाठी 32 उमेदवार मैदानात आहे यात सर्वसाधारण गटात 2 पॅनल व्यतिरिक्त दोन अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. सर्वसाधारण मतदारसंघात 10 जागांसाठी 22 उमेदवार रिंगणात आहेत इतर मागासवर्गीय मतदारसंघ, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ, भटक्या विमुक्त जाती मतदारसंघातून प्रत्येकी दोन उमेदवार समोरासमोर लढत आहे. महिला राखीव मतदारसंघात २ जागांसाठी ४ महिला उमेदवार रिंगणात आहे. मागील वर्षी सात संचालकांनी राजीनामा दिल्यामुळे अल्पमतात संचालक मंडळ आल्याने बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. या निवडणुकीत जामनेर पाचोरा भडगाव तालुक्याचे लक्ष लागून आहे.

12 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी एकूण 9610 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.
मतदान केंद्र गाव निहाय खालील प्रमाणे –
पाचोरा – श्री गो से हायस्कूल गिरड रोड पाचोरा
भडगाव – सौ सुमनताई गिरधर पाटील न्यू इंग्लिश स्कूल भडगाव

नगरदेवळा – सरदार एस के पवार हायस्कूल नगरदेवळा

शेंदुर्णी – जिल्हा परिषद शाळा शेंदुर्णी
जामनेर – जिल्हा परिषद शाळा जामनेर
जळगाव – कै. दादासो केशवराव भोईटे माध्यमिक विद्यालय जळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here