ज्येष्ठ बुद्धिबळ संघटक पोपटभाई पटेल यांचे निधन

क्रीडा

औरंगाबादेत खºया अर्थाने बुद्धिबळ खेळ रुजवणारे तसेच अनेक नामवंत बुद्धिबळपटू घडविणारे, ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच मराठवाड्याचे बुद्धिबळातील द्रोणाचार्य समजले जाणारे पोपटभाई पटेल यांचे आज गुरुवारी रात्री वयाच्या ८७ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.

औरंगाबाद : औरंगाबादेत खºया अर्थाने बुद्धिबळ खेळ रुजवणारे तसेच अनेक नामवंत बुद्धिबळपटू घडविणारे, ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच मराठवाड्याचे बुद्धिबळातील द्रोणाचार्य समजले जाणारे पोपटभाई पटेल यांचे आज गुरुवारी रात्री वयाच्या ८७ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात बुद्धिबळ संघटक हेमेंद्र पटेल यांच्यासह तीन मुले, दोन मुली, नातू व पणतू, असा परिवार आहे. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता त्यांच्या सुपारी हनुमान रोड येथील राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून, कैलास स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *