Breaking

केशवसुत रौप्य महोत्सवी वर्षाच्या दुसऱ्या दिवशी धुळे येथील प्रा .संजीव गिरासे व मालेगाव येथील प्रा .एस .के .पाटील यांच्या कथाकथन कार्यक्रम सादर झाला .( ध्येय न्युज बिरोचिफ सागर महाजन)

0

भडगाव : प्रतिनिधी प्रा .गिरासे यांनी दिलसे ही कथा आपल्या अभिनय कौशल्याने बहारदार पद्धतीने तर प्रा .पाटील यांनी झोंब्यानं लगीन ही अहिराणी बोली भाषेतील कथा सांगून श्रोत्यांना लोटपोड हसवले .विनोद हा जीवनातील एक रस आहे .विदूषक आपले दुःख पोटात ठेवतो व समाजाला हसवतो .हसणं हे ताणतणावरील टॉनिक आहे .म्हणून माणसाने मनमुराद हसले पाहिजे ,असं प्रतिपादन दोन्ही कथाकथन कार्यानी केले .हे पुष्प भडगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एन .एन .गायकवाड यांनी व कोठली येथील रहिवाशी आर .डी .पाटील यांनी आपल्या आजी व आजोबा यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केले होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश शिंपी यांनी केले .

कविसंमेलन :
राजकीय ,सामाजिक ,धार्मिक , आर्थिक ,बेरोजगारी ,या विषयावर उपरोधिक भाष्य करत जीवनातील वास्तव स्पष्ट पणे मांडत श्रोत्यांना हसवत हसवत मनोरंजनातून प्रभोधन करत दुसऱ्या सत्रातील कविसंमेलन उत्तोरोत्तर रंगत गेले .कवी रामदास फुटाणे ,अशोक नायगावकर ,नारायण पुरी .नितीन देशमुख ,भरत दौंडकर यांनी कविसंमेलनात विविधांगी कविता सादर करून सद्य स्थितील राजकारण ,समाजकारण ,अर्थकारण ,जातीय द्वेष ,सामाजिक अधःपतन ,राष्ट्रीय एकात्मता या विषयावर मार्मिक भाष्य केले ,कधी चिमटे घेउन तर कधी काळजाला हात घालत ,शेतकरी ,कष्टकरी समाजाचं चित्रण डोळ्यासमोर उभे केले .या कवीसंमेलनाला श्रोत्यांनी प्रचंड गर्दी केली होती .भडगाव सारख्या लहानश्या गावात कवी केशवसुतांची स्मृती 25वर्षांपासून जतन केली जात आहे ,याबाबत कवी अशोक नायगावकर व रामदास फुटाणे यांनी समाधान व्यक्त केले .मालगुंड ही केशवसुतांची जन्मभूमी आहे हे आपण मान्य करून त्यांच्या कर्मभूमीत हे रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरे करीत आहात ,अशी सुरुवात करत श्री .रामदास फुटाणे यांनी सध्यस्थिती बाबत वर्णन करून कविसंमेलनाचे सूत्रसंचालन केले .सदर कविसंमेलन भडगाव पाचोरा मतदार संघांचे आमदार किशोर पाटील यांनी आपले पिताश्री कै .धनसिंग पाटील यांच्या स्मरणार्थ ,माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी आपला पुत्र कै .डॉ .योगेश याच्या स्मरणार्थ ,सौं .कविता राहुल पाटील यांनी आपल्या बंधू कै .धनंजय याच्या स्मरणार्थ प्रायोजित केले होते .कविसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रा .डॉ .अतुल देशमुख यांनी केले .

पालकमंत्री यांची सदिच्छा भेट :
केशवसुत ज्ञानप्रभोधिनी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संपन्न होत असलेल्या कार्यक्रम स्थळी पालकमंत्री श्री .गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन या सांस्कृतिक सोहळ्यास शुभेच्छा दिल्या व प्रभोधिनीच्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले .प्रभोधिनीचे अध्यक्ष विजय देशपांडे यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला .याप्रसंगी आमदार किशोरआप्पा पाटील माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here