Breaking

भडगाव केशवसुत ज्ञानप्रभाषधिनीच्या रौप्य महोत्सवी व्याख्यानमालेत हास्यकल्लोळ (भडगाव ब्युरो चिफ सागर महाजन)

0

भडगाव :_राजकीय ,सामाजिक ,सिनेकलावंत ,यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करून शरद पवार ,विलासराव देशमुख ,आर .आर .पाटील ,देवेंद्र ,फडणवीस ,नरेंद्र मोदी ,निलू फुले ,श्रीराम लागू ,आण्णा हजारे इत्यादी मान्यवरांच्या आवाजात श्रोत्यांशी संवाद साधतं प्रा .दीपक देशपांडे यांनी मनमुराद हसवले .त्यांनी येथील केशवसुत ज्ञानप्रभाषधिनीच्या रौप्य महोत्सवी व्याख्यानमालेत आपला हास्यकल्लोळ हा बहारदार कार्यक्रम सदर केला

व्यासपीठावर प्रायोजक पी .टी .सि .चेअरमन संजयनाना वाघ ,संचालक सतीश चौधरी डॉ .जयंतदादा पाटील हे उपस्थित होते .या कार्यक्रमास श्रोत्यांनी प्रचंड गर्दी केली होती .
विविध भागातील बोलीभाषा व त्यामुळे होणारे विनोद ,प्रत्येक प्रदेशाची एक विशिष्ट लकब यातून श्रोत्यांचे मनोरंजन केले .याप्रसंगी सर्व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी व शोभायात्रेत सहभागी जागृती मित्र मंडळ ,सद्गुरु ओवी मंडळ यांचा सन्मान करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कौंडिण्य यांनी तर आभार विजय देशपांडे यांनी व्यक्त केले .
दुपारी शहरातील सर्व नागरिकांसाठी मुक्तव्यासपीठ या अंतर्गत कथा ,कविता ,उखाणे ,एक पात्री प्रयोग ,सायबर कॅराईम ,हिंदी चित्रपट गिते सादर केलीत ,सौं .प्रतिभा कुळकर्णी व प्रा .डॉ .दीपक मराठे यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here