Breaking

भडगाव नगराध्यक्ष देखील नगरसेवकां मधुन होणार ( भडगाव ध्येय न्युज ब्युरो चिफ सागर महाजन सोबत प्रतिनिधी माधव जगताप)

0

भडगाव-राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कॅबिनेटनं सहा मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांना ठाकरेंच्या कॅबिनेटनं मंजुरी दिली असून, आता जनतेतून नव्हे तर नगरसेवकांमधून नगराध्यक्षाची निवड होणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्हयातील भडगाव नगराध्यक्ष सुद्धा नगर सेवकांमधुन होईल हे स्पष्ट झाले आहे फडणवीस सरकारचा निर्णय ठाकरे सरकारनं बदलला आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवड ही निर्वाचित नगरसेवकांमधून करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सध्या नगराध्यक्षांची निवड थेट जनतेमधून करण्यात येते.
नगरसेवकांमधून होणार नगराध्यक्षाची निवड
नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवड ही निर्वाचित नगरसेवकांमधून होणार आहे. यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सध्या नगराध्यक्षांची निवड थेट जनतेमधून करण्यात येते. या बैठकीत अधिनियमात प्रस्तावित सुधारणा करण्यासाठी अध्यादेश प्रख्यापित करण्याची राज्यपालांना विनंती करण्यास आणि विधि व न्याय विभागाच्या सल्ल्याने अध्यादेशाचा मसूदा अंतिम करण्यास मान्यता देण्यात आली*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here