Breaking

आदिवासी समाजाच्या स्मशानभुमीत दफन विधी केलेल्या प्रेताची विटबंना थाबंविण्यात यावी- तहशिलदार सौ. माधुरी आंधळे यांना निवेदन

0

भडगावः-शहरातील आदिवासी भिल समाजाच्या स्मशानभुमीत दफन विधी केलेल्या प्रेताची विटबंना होत असुन ही विटबंना थाबंविण्यात यावी आश्या मागणीचे निवेदन एकलव्य संघटनेच्या वतीने तहशिलदार सौ. माधुरी आंधळे यांना देण्यात आले.
शहरात अदिवासी भिल समाज स्वातंत्र्य पुर्व काळापासून वास्तव्यास आहे. भिल आदिवासी समाज पुर्वी पासुन वहीवाट नुसार गट न.१०/१/२ या जागेत आदिवासी मयत व्यक्तीचे दफनविधी करत आहे. या दफन भुमीत आज रोजी संबंधित शेतकरी व ठेकेदार प्लाॕट पाडण्यासाठी त्या जागेवर मोठ्या प्रमाणात जेसीबी च्या साह्याने उत्खनन करीत आहे. या उत्खननात जमिनीत पुरलेले प्रेत, सांगडे जेसीबीने काढुन नाल्यात, रस्त्यावर, गटारीत अश्या ठीकाणी ट्रक्टर मध्ये भरुन उघड्यावर फेकुन देत आहे. यामुळे समाजाच्या पुर्वजांचे प्रेताचे अंशाची विटंबना होवुन आमच्या सामाजिक धार्मिक भावना दुखविण्याचे काम संबंधित ठेकेदार व शेतकरी करीत आहे. या ठेकेदार व शेतकरी विरुध्दअनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा प्रमाणे कार्यवाही करुन प्रेताची होणारी अवहेलना व विटबंना थाबंवुन सदरचे काम बंद करण्यात यावे. अन्यथा एकलव्य संघटनेच्या वतीने जिल्हाभर रस्त्यावर उतरुन उग्रस्वरुपाचे आदोंलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहिल असे निवेदना नमुद केले आहे.
निवेदनावर एकलव्यसंघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ, तालुकाध्यक्ष रविद्र सोनवणे, शहरध्यक्ष दशरथश मोरे, नगरसेवक संजय सोनवणे, विनोद मोरे, दिनकर सोनवणे, मुरलीधर सोनवणे, विजु ठाकरे, रामदास मालचे, लक्ष्मण सोनवणे, बबलु मालचे, सुरेश गायकवाड, परमेश्वर गांगुर्डे यांच्या सह्या आहेत. सदर निवेदन देताना शहरातील १०० ते १५० आदिवासी पुरुष, महिला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here