तब्बल नऊ तास आकाशात इंद्रधनुष्य

व्हिडिओ न्यूज

ताइपेइ (तैवान) – पावसाळ्यात आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य अनेकदा पाहायला मिळते. निसर्गाची ही सुंदर निर्मिती काही सेकंदासाठी दिसते. परंतु, तैवानमध्ये तब्बल 9 तासांहून अधिक काळ आकाशात इंद्रधनुष्य पाहायला मिळाले.

ताइपेइमध्ये ही इंद्रधनुष्यातील सप्तरंगांची उधळण पाहायला मिळाली. ही निसर्गाची किमया पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. या इंद्रधन्युष्याची ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी इंग्लडमध्ये सर्वाधिक काळ इंद्रधनुष्य दिसले होते. 1994मध्ये जवळपास 6 तासांहून अधिककाळ इंद्रधनुष्य पाहायला मिळाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *