Breaking

भडगाव नगर पालीका निवडणुक पार्श्वभुमीवर मतदारांची नावे वाढ आक्षेप प्रमाण वाढणार( ध्येय न्युज प्रतिनीधी – माधव जगताप)

0

भडगांव -नगरपरिषदेची निवडणूकीचे वातावरण तापायला सुरवात झाली असुन येत्या 2 महीन्यात केव्हाही निवडणुकीची घोषणा होऊन शकते नगराध्यक्ष निवड आता नगरसेवकां मधुन होणार असल्याने ज्यांनी साडेचार वर्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडीचे स्वप्न पाहीले ते स्वप्न आता उध्वस्त झाली आहेत त्यामुळे नगरराध्यक्ष निवडीच्या वेळी घोडेबाजार होण्यापेक्षा आताचपासुनच आपले नगर सेवक जास्तीस जास्त संख्येने निवडून येण्यासाठी रणनिती आखत आहेत परंतु येणाऱ्या भडगाव न.पा. निवडणुकीत आमदार किशोरआप्पा & माजी आमदार दिलीपभाऊ वाघ म्हणजेच महाराष्ट्रातील महायुती पॅटर्न भडगाव मध्ये राबवले गेले तर भडगाव न.पा. निवडणुक एकतर्फी होईल अशी चर्चा आहे तरी देखील धोका नको प्रत्येक इच्छुक उमेदवार आप- आपल्या स्तरावर मतदार नांव वाढवण्याच्या मागे लागले आहेत तर राजकारण & युध्दाच्या रणागणात सर्व काही माफ हे गृहीत धरून मतदार वाढ करित आहे म नगरसेवकांनी चांगलीच कंबर कसली असून त्यामुळे भडगांव शहरात नगरपालिका मतदार याद्यांमध्ये अनेकांनी आपापल्या पद्धतीने बाहेर गावाच्या रहिवाशांचे, आप्तेष्ट, नातेवाईक, व मित्र मंडळी यांचे नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट केले असल्याची चर्चा आहे आपल्याला मतदान जास्त मिळावे व आपणच निवडून यावे यासाठी अनेकांनी आपापल्या प्रभागात 300 ते 400 नावे मतदार यादीमध्ये बोगस नावे समाविष्ट करण्यात आल्याची चर्चा असल्याने शहरातील बोगस नावांचे प्रमाण न 2000 च्या आसपास आहे.उमेदवार आपले बाहेरगांवचे नातेवाईक,मित्रमंडळी अशा व्यक्तींचे शहरात वास्तव्य नसताना मतदार यादीत नाव टाकल्याचे दबक्या आवाजात चर्चा आहे पण या सर्व प्रक्रीयेला निवडणूक आयोगाने,तहसिलदारांनी, नगरपालिका मुख्याधिकारींनी यांनी चौकशी करून त्या बोगस मतदारांचे नावे वागळवित व बोगस मतदानाला आळा घालावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्राप्त माहीती नुसार भडगांव शहरात मतदार याद्यांमध्ये बोगस मतदारांच्या नावाने 7 नं.फाॅर्म भरून हरकत घेण्यात आली असून बोगस मतदारांना नोटीस निवडणूक आयोगाकडून पाठवण्यात आली आहे व योग्य ती चौकशी होणार असल्याचेही सांगीतले जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here