Breaking

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ 15 एप्रिलपुर्वी द्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री दररोज आढावा घेणार

0

मुंबई, दि. 7: राज्यातील सुमारे 36 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देणारी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना 15 एप्रिल पूर्वी पूर्ण करावी. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून योजनेच्या प्रत्यक्षात अंमलबजावणीस सुरूवात झाल्यापासून दररोज त्याचा आढावा घेतला जाईल. देशातली सर्वात मोठी आणि अल्पावधीत राबविली जाणारी योजना यशस्वी करून दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि बॅंकेच्या अधिकाऱ्यांना केले.

कर्जमुक्ती योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा निवासस्थान येथून जिल्हा यंत्रणेशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते.

21 फेब्रुवारीपासून गावनिहाय याद्या प्रसिद्ध होणार

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले, हे सरकार सत्तेवर आल्यावर महिन्याभराच्या आत कर्जमुक्ती योजनेचे धाडसी पाऊल उचलले आहे. 21 फेब्रुवारीपासून गावनिहाय याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यावेळी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होईल. अशा वेळी प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना चांगली वागणूक द्यावी. त्याच्याशी सौजन्याने वागा. त्याचे म्हणणे ऐकून घ्या. त्याची तक्रार स्थानिक पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

कर्जमुक्तीची देशातली सर्वात मोठी योजना

ही कर्जमुक्त राबवितांना शेतकऱ्यावर आपण उपकार करतोय या भावनेतून काम करू नका असे सप्ष्ट करतानाच शेतकरी शासनाकडे आशेने पाहतोय त्याचे समाधान करा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ही योजना डिसेंबर मध्ये जाहिर केली आणि तिची अंमलबजावणी मार्चपासून करू असा शब्द शेतकऱ्याला दिला आहे. शेतकऱ्याने आतापर्यंत जो विश्वास दाखविला आहे त्याला तडा जाऊ देवू नका, असे आवाहन करतानाच कर्जमुक्तीची ही देशातली सर्वात मोठी योजनाचा असल्याचे सांगून संपूर्ण देशाचे आपल्याकडे लक्ष आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जिल्हा यंत्रणेला सांगितले.

15 एप्रिलपर्यंत योजना पूर्ण करावी

आताच्या काळापुरती ही योजना आहे. जिल्हा यंत्रणेने 31 मार्चपूर्वी ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. जास्तीत जास्त 15 एप्रिलपर्यंत योजना पूर्ण झाली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले. दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्यी अडचण समजून घ्या आणि त्यावर तत्काळ तेथेच उपाय शोधा. शेतकऱ्यांशी चांगले वागा. त्यांची शासनाबद्दल नाराजी राहणार नाही याची काळजी घ्या. आतापर्यंत योजनेचं काम अल्पावधीत व्यवस्थित झाले आहे त्यात सातत्य ठेवा, असे निर्देशही श्री. पवार यांनी यावेळी दिले.

ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आधारक्रमांकाचे प्रमाणीकरण होणार आहे तेथे प्रशिक्षीत कर्मचारी तैनात करावा. बायोमॅट्रीक मशिन तपासूण घ्यावे. याकामात जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिकरित्या लक्ष घालावे, अशी सूचना मुख्य सचिवांनी यावेळी केली. ज्या भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटी नाही तेथे जिल्हाधिकाऱ्यांनी दळणवळणाचा आराखडा तयार ठेवावा. गावनिहाय यादी प्रसिद्ध करतांना त्या त्या गावाचीच यादी आहे याची खातरजमा करण्याची दक्षता घ्यावी, असे मुख्य सचिवांनी सांगितले.

पोर्टलवर 88 टक्के डाटा अपलोड

दरम्यान, कर्जमुक्ती योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या पोर्टलवर 88 टक्के डाटा अपलोड करण्यात आला आहे. सुमारे 36.41 लाख शेतकऱ्यांनी दोन लाख रुपयांपर्यत पीक कर्ज घेतले आहे. त्यापैकी 32 लाख 16 हजार 278 शेतकऱ्यांची माहिती अपलोड झाली आहे.

कर्जखात्याशी आधार जोडणीचे प्रमाण 95 टक्के

अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलडाणा, जळगाव, जालना, नांदेड, नाशिक, परभणी, रायगड या जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांची एक लाखांपेक्षा जास्त संख्या आहे. कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडणीचे प्रमाण 95 टक्के आहे. त्यामध्ये व्यापारी बॅंकांचे 65.53 टक्के तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांचे प्रमाण 63.96 टक्के आहे.

आधारक्रमांकाचे प्रमाणीकरणाची सोय आपले सरकार सेवा केंद्र, बॅंका आणि स्वस्त धान्य दुकांनामध्ये करण्यात आली आहे. दि. 21 फेब्रुवारी रोजी पोर्टलवर याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर या गावनिहाय याद्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गावात चावडीवर लावण्यात येतील. जिल्हाधिकारी जिल्हास्तरीय समिती गठीत करतील.

95 हजार 769 केंद्रावर प्रमाणीकरणाची सुविधा

आधार प्रमाणीकरणासाठी राज्यभरात 8 हजार 184 केंद्र बॅंकांमध्ये सुरू करण्यात येतील. 26 हजार 770 आपले सेवा केंद्र, 8 हजार 815 सामाईक सुविधा केंद्र आणि 52 हजार स्वस्त धान्य दुकान अशा 95 हजार 769 केंद्रावर प्रमाणीकरणाची सुविधा आहे.

यावेळी सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी सादरीकरण केले. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवासन आदी अधिकारी उपस्थित होते.

00000
[07/02, 7:58 pm] जि मा का Vilas Bodakhe Jilha Mahiti Adhikari: | महासंवाद | DGIPR NEWS |शुक्रवार, ०७ फेब्रुवारी २०२० |

२३ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचे मुंबईत शानदार उद्‍घाटन
देशात ई-लोकशाही प्रणालीचा प्रारंभ करण्यासाठी ‘ई-गव्हर्नन्स परिषद’ उपयुक्त – उद्योगमंत्री सुभाष देसाई
http://bit.ly/2SumfPZ

महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणाऱ्या कला प्रदर्शनाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन
http://bit.ly/3blpn9x

बाडन-वुर्तम्बर्गच्या धोरण समन्वय मंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट
http://bit.ly/2HfoYYt

विज्ञान संस्थेचा पदवीदान सोहळा
‘व्हर्च्युअल क्लासरुम’च्या माध्यमातून शिक्षणसंस्थांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे मंत्री उदय सामंत यांचे आवाहन
http://bit.ly/2UyGE9i

दुष्यंत चतुर्वेदी यांना विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ
http://bit.ly/37cLZWw

पोलीस दल देणार तंदुरूस्तीचा संदेश; रविवारी ‘महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय दौड’

http://bit.ly/3bmyp5V

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग, जिओ चॅट आणि टेलिग्राम चॅनल वर फॉलो करू शकता.
[07/02, 11:47 pm] जि मा का Vilas Bodakhe Jilha Mahiti Adhikari: | महासंवाद | DGIPR NEWS |शुक्रवार, ०७ फेब्रुवारी २०२० |

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ १५ एप्रिलपूर्वी द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीपासून मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री दररोज आढावा घेणार
http://bit.ly/3bj7l7N

त्रि-भाषा सूत्राची केंद्राने प्रभावी अंमलबजावणी करावी; मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र
http://bit.ly/2H3XGEk

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्यासाठी जर्मनी- महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य करार
http://bit.ly/2UF1ovM

चीन व कोरोनाबाधित भागातून आलेल्या व्यक्तींना राज्यात भेदभावाची वागणूक देऊ नये – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन
राज्यामध्ये ५ जण निरिक्षणाखाली; २५ जणांना घरी सोडले
http://bit.ly/2UwTW5V

औषधांच्या उपलब्धतेसाठी हाफकिन संस्थेत बैठक
राज्यातील आरोग्य केंद्रांच्या औषध पुरवठ्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून आढावा
http://bit.ly/39kGLJp

चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या कामाला गती देण्याचे पालकमंत्री ॲड.अनिल परब यांचे निर्देश
http://bit.ly/388rQlE

महाराष्ट्रातील पर्यटनवृद्धीसाठी चेन्नई येथे ‘रोड शो’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद
http://bit.ly/2UEEqoV

वरसई आश्रमशाळेतील विद्यार्थिनी मृत्यूप्रकरणी दोन महिला अधीक्षिका आणि मुख्याध्यापक निलंबित
http://bit.ly/2Oz0kpw

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या ‘आपला महाराष्ट्र’ विशेष वार्तापत्र
http://bit.ly/31ydx7r

 राजधानीतून…
राजधानीत १४ ते २१ फेब्रुवारीदरम्यान ‘छत्रपती शिवाजी महोत्सवाचे’ आयोजन

http://bit.ly/2UC0n7R

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग, जिओ चॅट आणि टेलिग्राम चॅनल वर फॉलो करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here