Breaking

साधना शाळेतील इ.दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

0

कासोदा ( सौ-स्वाती मोरे ) येथील ज.जि.म.वि.प्र.सह.संस्थेच्या
साधना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासोदा येथे इ.१०वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संस्थेचे संचालक एस.आर.पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेस माल्यार्पण व द्विपप्रज्वलन करून करण्यात आली. त्याप्रसंगी शाळेतील आदर्श विद्यार्थी म्हणून धिरज रवंदळे मालखेडे , धनश्री पाटील फरकांडे , मानसी खैरनार कासोदा , वसुधा सूर्यवंशी , गायत्री लोहार या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुन्यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी प्राचार्य सी.जी.पाटील सर , माजी विद्यार्थी संजय जमादार सर हे होते , तर कार्यक्रमास प्रशांत श्रीराम पाटील , प्रभाकर भामरे उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बि.जे.बेडसे सर यांनी केले . तर आभार के.के. पवार सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीते साठी विद्यालयाचे सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी बंधु – बघिनींनी मेहनत घेतली . तद्नंतर सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here