Breaking

भङगाव येथे ३३ फुट शिवलिंग दर्शन (भडगाव ब्युरोचिफ सागर महाजन & प्रतिनीधी माधव जगताप)

0

भङगाव – भडगाव प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय मार्फत भडगाव शेतकरी सहकारी संघ प्रांगणात दि.७ रोजी सकाळी १० वाजता भव्य दिव्य अाध्यात्मिक शिवदर्शन मेळावा तथा १२ ज्योतिलिंग दर्शन,३३ फुटी शिवलिंग दर्शन व्हिडीयो शो,विश्वकर्मा गेम्स उदघाटन तहसिलदार माधुरी अांधळे,पोलीस निरीक्षक धनंजय वेरूळे यांच्या हस्ते करण्यात अाले. यावेळी जळगाव झोनचे बी.के.मिनाक्षी दिदि, पाचोरा अमोल शिंदे, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन प्रतापराव पाटील, नगरसेवक अमोल पाटील,नगराध्यक्ष अतुल पाटील,मनसुखलाल जैन, सौरभ पाटील अादि उपस्थित होते.या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष पाचोरा चे अमोल शिंदे , तहसिलदार माधुरी अांधळे,पोलीस निरीक्षक धनजंय येरूळे यांनी अापले मनोगत व्यक्त केले तर जळगाव झोनचे बी.के.मिनाक्षी दिदि यांनी सविस्तर विद्यालयाची माहिती दिली.तद्नंतर पो.नि.धनंजय येरूळे यांच्यासह १२ जोडप्यांनी १२ शिव ज्योतीलिंग च्या पुजा व अारती करण्यात अाली. अाध्यात्मिक वातावरणात कार्यक्रमाची शुभारंभ झाला.कार्यक्रम यशस्वी भडगाव विद्यालयाचे बी.के.पुष्पा दिदि.डाॅ.शिरीषकुमार भोसले,सी.अार पवार,हिरे , डाॅ.मराठे रविद्र बेहरे सह सर्व बी.के. परीवारांनी परीश्रम घेतले.सदर कार्यक्रम चे नियोजन दि.७ फेब्रवारी ते ८ फेब्रवारी सकाळी १० ते रात्री १० वाजे पर्यंत ठेवण्यात अाला अाहे.तरी सर्व भाविकांनी जास्त जास्त संख्येने या ठिकाणी येऊन १२ शिव ज्योतिलिंग व ३३ फुटी शिवलिंग दर्शन घ्यावे असे आव्हान भडगाव प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय च्या बी.के. पुष्षा दिदि यांनी केले अाहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here