Breaking

प्रा. देवेन्द्र मस्की यांची ग्राहक पंचायत कार्यकारिणीवर नियुक्ती (भडगाव-ब्युरोचिफ सागर महाजन & प्रतिनीधी माधव जगताप)

0

भडगाव – प्रतिनिधी अखिल भारतीय ग्राहक पंचायत भडगाव शाखेची बैठक नुकतीच युनिक काँम्पुटर येथे महाराष्ट्र शासनाच्या ग्राहक संरक्षण परीषदेवरील सदस्य तथा ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष श्री विकास महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली
या बैठकीत प्रा.देवेन्द्र मस्की यांची भडगाव तालुका ग्राहक पंचायतीच्या कार्यकारिणीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली. या बैठकीस प्रा.सुरेश कोळी ,राजेश पाटील, दिलीप तडवी, भगवान रोकडे, भडगाव तालुका संघटक दिनेश पाटील, जळगाव महानगर अध्यक्ष जगन्नाथ तळेले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. देवेन्द्र मस्की यांच्या नियुक्तीबद्दल ग्राहक पंचायतीचे प्रांत अध्यक्ष धनंजय गायकवाड, राष्ट्रीय महासचिव अरुण देशपांडे, भडगाव तालुका ग्राहक पंचायत अध्यक्ष श्री सुरेश रोकडे व जिल्ह्याभरातील ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे . त्याचे प्राध्यापक संघटना ( मुक्ता )चे प्रा.जी.एस.अहिरराव ,प्रा.एस.आर.पाटील.प्रा.सी. एस. पाटील प्रा .संजय भैसे, प्रा.रचना गजभिये. प्रा.बी.एस.भालेराव ,प्रा.एस.एन.हडोळतीकर यांनी अभिनंदन केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here