Breaking

भडगावच्या न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे होणार नामांतर (भडगाव-ब्युरोचिफ सागर महाजन & प्रतिनीधी माधव जगताप)(भडगाव-ब्युरोचिफ सागर महाजन & प्रतिनीधी माधव जगताप)

0

भडगाव – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय,भडगाव या कनिष्ठ महाविद्यालयाच्या नामकरणासाठी भडगाव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री गणेश लक्ष्‍मण पूर्णपात्री यांनी संस्थेला देणगी दिली. श्री. गणेश लक्ष्‍मण पूर्णपात्री व सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री हे दांपत्य भडगावच्या माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक म्हणून सेवाव्रत होते. त्यांनी आपल्याच संस्थेला कनिष्ठ महाविद्यालयाच्या नामकरणासाठी भरघोस रकमेची देणगी दिली. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ यांनी त्यांचे आभार मानले. संस्थेच्या वतीने 2 फेब्रुवारी 2020 च्या मॅनेजिंग कमिटीच्या सभेमध्ये ठराव पारित करून भडगावच्या कनिष्ठ महाविद्यालयास 'सौ.जयश्री गणेश पूर्णपात्री कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,भडगाव' असे नामकरण करण्याचा ठराव पारित केला. दिनांक 7 फेब्रुवारी 2020 रोजी शुक्रवारी या नामकरणाचा करार व धनादेश आदान-प्रदान करण्याचा कार्यक्रम भडगावच्या सौ.सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय येथे संपन्न झाला. त्यावेळी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन व्ही.टी. जोशी, माध्यमिक विद्यालयाच्या शालेय समितीचे आबासो दत्ता पवार, किमान कौशल्य विभागाचे चेअरमन विजयराव देशपांडे, संचालक सतीश चौधरी, मुख्याध्यापक सुधीर पाटील, संचालिका सौ.मनीषाताई अरुण पाटील व पर्यवेक्षक, शिक्षकवृंद, शाळेचे ज्येष्ठ लिपीक सुभाष देवळे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी सर्वांनी पूर्णपात्री दांपत्याचा सत्कार केला. संस्थेचे ज्येष्ठ संचालक नानासाहेब देशमुख, कनिष्ठ महाविद्यालय शालेय समितीचे चेअरमन विनय जकातदार यांनीसुद्धा पूर्णपात्री दांपत्याचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here