मानवाला वापरता येणार चार हात

व्हिडिओ न्यूज

माणसाला अचाकन चार हात आले तर..? काल्पनिक वाटतयं ना..? परंतु, आता लवकरच माणसाला चार हातांचा वापर करता येणार आहे. यूबायोनिक या इटलीतील रोबोटिक्स कंपनीने हे नवे तंत्रज्ञान शोधले आहे.

कंपनीच्या फेदेरिको सिकार्से यांनी हे कृत्रीम हात डिझाईन केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1993 मध्येच या प्रकारच्या संशोधनाला सुरुवात झाली होती त्यामध्ये आता प्रगती झाली असून, माणसाच्या हाताला आणखी दोन हात जोडणे शक्य झाले आहे. यामध्ये 3डी प्रिंटेड डिव्हाईसचा वापर करुन मानवी हातावरच दोन्ही रोबोटिक्स हाताचे सेन्सेस देण्यात आले आहेत.

हे रोबोटिक्स हात पहिले परिधान करता येण्यासारखे रोबोटिक्स हात असून, मानवाच्या नैसर्गिक हाताच्या रचनेला जोड म्हणून याचा मोठा फायदा होणार आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील हा मोठा शोध असल्याचा दावा यूबायोनिक कंपनीने केला आहे.

या रोबोटिक्स हातांचा एक व्हिडिओ देखील कंपनीने आपल्या वेबसाईटवर अपलोड केला आहे. परंतु, या व्हिडिओमध्ये या रोबोटिक्स हातांची ताकद, त्याचा वापर कसा करता येईल याबाबतची माहीती नाही. शिवाय व्हिडिओ बघून या हातांचे उपयोग काहीसे मर्यादित असल्याचेही जाणवते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *