Breaking

NAAC तज्ञ समिती समवेत एम. एम. कॉलेज माजी विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक सहविचार सभा

0

श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालय, पाचोरा येथे दि. 12 फेब्रूवारी 2020 रोजी बंगलोरच्या NAAC येथून तज्ञ समिती महाविद्यालय परीक्षण साठी येणार आहे व आपल्या महाविद्यालयाला मनांकन ( ग्रेड ) देणार आहे.
NAAC तज्ञ समिती समवेत आपल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक यांच्या सहविचार सभेचे आयोजन दि. 12 फेब्रूवारी 2020 रोजी दुपारी 2. 30 वाजता करण्यात आलेले आहे.
आपल्या महाविद्यालयातील माजी विद्यार्थी राजनीती, सामाजिक, शैक्षणिक,वैद्यकीय,न्यायालयीन, प्रशासनिक, व्यवसाय व इतर विविध क्षेत्रात सर्वोत्तम सेवा देत आहेत व महाविद्यालयाचे नावलौकिक करीत आहेत.
आपण सर्वानी ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतले, ज्या ठिकाणच्या आपण आपल्या आयुष्यातील खुप चांगल्या स्मृति जपून ठेवल्या त्या महाविद्यालयासाठी आपण वेळ द्यावा व NAAC समिती सोबतच्या मीटिंग साठी 12 फेब्रूवारी 2020 रोजी दुपारी 2.30 वाजता आपला बहुमूल्य वेळ काढून उपस्थित राहावे व आपल्या महाविद्यालयाला चांगली ग्रेड मिळेल या दृष्टीने प्रयत्न करावेत हे आवाहन
प्राचार्य डॉ भीमराव N पाटील (एम एम कॉलेज, पाचोरा) यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here