Breaking

कॉपी प्रकरणी 3 कर्मचाऱ्यांवर भडगाव पो. स्टे. ला गुन्हा दाखल (ध्येय न्युज ब्युरोचिफ सागर महाजन सह प्रतिनिधी माधव जगताप)

0

भडगाव -तालुक्यातील कोळगाव येथील केंद्र क्रमांक ९१७ गोपीचंद पूना पाटील महाविद्यालय येथे बारावीचा इंग्रजी या विषयाचा पेपर सुरू असताना भरारी पथक तपासणी साठी गेले असता शाळेतील कस्टडी रुम मध्ये टेबलावर इंग्रजी विषयाच्या प्रश्न पत्रिकेत असलेली लीहलेली उत्तर पत्रिका व काही झेरॉक्स आढलुन आल्या म्हणून केंद्र संचालक, शाळेतील कर्मचारी व शिपाई यांच्यावर भडगाव पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी डॉ. मंजुषा सुधाकर क्षिरसागर वय -४५ धंदा – प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आज दि.१८ पासून ईयत्ता बारावी विची परीक्षा सुरू झाली व इंग्रजी या विषयाचा पेपर होता. आमच्या भरारी पथकाने सकाळी ११:३० वाजता भेट दिली असता खिडक्यांमधून विद्यार्थांना कॉप्या पुरविताना दिसून आले. तसेच काही लोक बाहेर पडताना दिसले सौंशययास्पद हालचालीवरून आम्ही त्यांना खोली उघडण्यास सांगितले. सुरुवातीस खोली उघडण्यास टाळाटाळ केली परंतु नंतर खोली उघडली असता खोली ही कस्टडी रुम आहे आणि त्यामध्ये परीक्षेचे गोपनीय साहित्य ठेवले होते. त्या मध्ये आम्हाला टेबलावर परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या प्रश्न पत्रिकेत असलेल्या प्रश्नाची उत्तरे लीहलेल्या कागदांची प्रत दिसून आली या शिवाय या खोलीमध्ये मोबाईल व त्याची तपासणी केली असता त्या मधील वॉट्स अप मध्ये परीक्षांची उत्तरे लिहलेले कागदाचा फोटो कॉपी काढलेली दिसून आली. सदर मोबाईल हा त्या शाळेतील कर्मचारी अरविंद देसले यांचा होता. व सदर फोटो कोणी पाठवला विचारले असता भरत तुकाराम पाटील यांनी पाठवला असे सांगितले. म्हणून केंद्र संचालक राजेंद्र संभाजी पाटील , कर्मचारी अरविंद जगन्नाथ सावंत व शिपाई भरत तुकाराम पाटील यांच्यावर भडगाव पोलिस स्टेशनला महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व वितर विनाधित्स्त परीक्षा मध्ये होणाऱ्या गैर प्रकारास प्रतिबंध करणे बाबत अधिनियम १९८२ चा कायदा कलम ५ व ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो. हे. कॉ. पांडुरंग सोनवणे हे करीत आहे.
सदर सौंस्थेच्या तालुक्यात इतर महाविद्यालय मध्ये बारावी बोर्ड परीक्षा सुरू असून या आरोपींनी तालुक्यात सादर प्रश्न पत्रिका वॉट्स अप माध्यमातून पसरवली असल्याचे सौंशय निर्माण होत आहे. तरी या दहावी व बारावी परीक्षेत कॉपी हा प्रकार बंद होईल की नाही असा सवाल सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here