Breaking

दि पाचोरा पीपल्स बँक तज्ञ संचालकपदी रविभाऊ केसवानी यांची निवड पण?

0

पाचोरा जामनेर जळगाव या परिसरातील शेतकरी व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याची म्हटली जाणारी बँक म्हणजे दि पाचोरा पीपल्स बँक या बँकेत नुकतीच निवडणुक होऊन तब्बल 28 वर्ष असलेल्या एकतर्फी सत्ता उलथून टाकण्यास सहकार पॅनल उमेदवारांना यश आले आणि या वर्षी पाचोरा पीपल्स बँकेच्या सत्तेवर एकतर्फी सहकार पॅनलच्या उमेदवारांनी विजय प्राप्त केला अर्थात हा विजय प्राप्त जरी झाला तरी विद्यमान संचालक मंडळाला बँकेच्या प्रगतीसाठी मोठ्या अग्नि परीक्षेतून जावे लागणार आहे आणि अधोगतीला असलेल्या बँकेला पुनश्च तेच वैभव व प्रतिष्ठा निर्माण करण्याची जबाबदारी संचालक मंडळावर आली आहे त्यामुळे विद्यमान संचालक मंडळ आता बँकेसाठी किती प्रयत्न वेळ आणि योगदान देतात हे या वर्षाच्या 31 मार्च च्या अखेरीस समजणार आहे त्यासाठी अत्यंत मुत्सद्दी विद्यमान संचालक मंडळ हळुवारपणे आपल्या हालचाली करीत आहे याचा प्रत्यय नुकतेच स्वीकृत सदस्य म्हणून निवड केलेले रविभाऊ केसवानी यांच्या निवडीवरून लक्षात येते कारण स्वीकृत सदस्यपदी निवड झालेले रविभाऊ केसवानी हे आमदार किशोर आप्पा पाटील व मुकुंदा बिल्दीकर यांचे निकटवर्तीय जरी म्हणले जात असले तरी पाचोरा पीपल्स बँकेच्या इतिहासात पहिल्यांदा सिंधी समाजाला रवीभाऊ केसवानी यांच्या रूपाने प्रतिनिधित्व प्राप्त झाले आहे त्यांच्या निवडीबद्दल ध्येय न्युज परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा दुसरी बाजु म्हणजे 3 आपत्य & कर्जदार निकष लक्षात घेता त्यांच्या निवडीमुळे विरोधकांच्या त्यांना अपात्र करण्यासाठी ज्या गुप्त पद्धतीने ज्या हालचाली सुरू झाल्या आहेत त्यावर मात करण्यासाठी विद्यमान संचालक मंडळ किती यशस्वी ठरते हे वेळ आणि काळ सांगेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here