Breaking

वडजी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप (भडगाव-ब्युरोचिफ सागर महाजन & प्रतिनीधी माधव जगताप)

0

भडगाव कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या वडजी टी.आर.पाटील विद्यालयात इ.10 वी विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील होते. केंद्रप्रमुख संजय न्याहिदे,नगरसेविका योजना पाटील, स्कूल कमिटी सदस्य दिलीप पाटील,भिकन पाटील,एकनाथ गायकवाड,विजय पाटील,सर्व शिक्षक शिक्षिका,शिक्षकेतर वृंद,विद्यार्थी,विद्यार्थीनी उपस्थित होते.सदर प्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस.आर.पठाण,पर्यवेक्षक ए.एस.पाटील तसेच साधनाई टॅलेंट सर्च व एकलव्य परीक्षा यशस्वी विद्यार्थांचा सत्कार सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक डी.डी.पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण अनुभव बाबतीत आपले मनोगत व्यक्त केले.बी.वाय.पाटील,एस.जे.पाटील,डी.एम.पाटील,आर.एच.बोरसे,जे.एच.पवार यांनी मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन आर.एम.पाटील, आभार एम.एस.देसले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here