Breaking

अवैध वाळू उपसा प्रकरणी पिंपळगाव बु ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन (ध्येय न्युज ब्युरो चिफ सागर महाजनसह प्रतिनीधी माधव जगताप)

0
भडगाव – प्रतिनिधीतालुक्यातील पिंपळगाव बु||येथील गिरणा नदी पात्रात बेसुमार अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांना ग्रामस्थांनी विरोध केला असता वाळू माफियां कडून धमक्या देण्यात येत आहे तसेच दररोज रात्री बेसुमार वाळू वाहतूक होत असून याबाबत पिंपळगाव ग्रामस्थांकडून तहसीलदार माधुरी आंधळे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की,पिंपळगाव बु।। येथील गिरणा नदीतील वाळू रात्री-बेरात्री चोरी होत असून, सदर गावकरी रात्री नदीत जाऊन ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेल्यावर ट्रॅक्टर मालक ड्रायव्हर व वाळू भरणारे मजूर हे गावकऱ्यांना मारण्याची धमकी व शिवीगाळ करतात तरी ही वाळू चोरी बंद होण्यासाठी आपल्या कार्यालयामार्फत वाळू चोरी थांबवण्यासाठी योग्य ती कारवाई होत नसल्यामुळे वाळू भरण्यासाठी दररोज कमीत कमी40ते50 ट्रॅक्टर नदीत वाळू चोरीसाठी येतात व मजूर कमी प्रमाणात असल्यामुळे ते जेसीबीने वाळू भरतातसदर वाळू उपसा करणारे तालुकास्तरावर राहत असल्याने मौजे पिंपळगाव बु येथील ग्रामस्थ बाजार पेठ भडगाव असल्याने वाळू चोरी करणारे हे पिंपळगाव बु ग्रामस्थांना बाजार करण्यासाठी तुम्ही कसे येतात, तुम्हाला बघू तुमचे हातपाय तोडू अशी धमकी देतात तरी आपल्या मार्फत वाळू चोरी करणाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करावी कार्यवाही अन्यथा पिंपळगाव बु ग्रामस्थ आमरण उपोषण बसणार असून या बाबत त्वरित कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here