Breaking

पाचोऱ्यात उद्या दुकाने बंद संदर्भात सभ्रम अखेर दुर

0

पाचोरा – कोरोना च्या पार्श्वभूमीवर येथील आमदार, प्रातांधिकारी, तहसीलदारांसह ,पोलिस उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षकांची प्रांताधिकारी यांच्या दालनात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सुचना व प्रसिद्धी माध्यमांद्वारे अधिकृत माहिती पत्रक देखील काढले.
मात्र आज दि.19 मार्च रोजी मा.जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांनी अधिकृत पत्र वजा आदेश काढुन हाॅटेलमधील मॅरेज हाॅल, लाॅन्स, मंगल कार्यालये पुढील आदेशापर्यत बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणेसाहेब यांनी दिले.
यासंदर्भात पाचोरा शहरात चुकीचा अर्थ काढुन उलट – सुलट चर्चा सुरू झाली मात्र ध्येय न्युजने पाचोरा प्रांत अधिकारी श्री राजेंद्र कचरे साहेब व न.पा. मुख्याधिकारीसाहेब श्रीमती शोभा बावीस्कर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी थेट मा.जिल्हाधिकारी साहेबांच्या अधिकृत पत्राची कॉपी देऊन वरील माहीती सांगीतली तरी देखील या बातमी सोबत माहीतीस्तव ध्येय न्युजने मा. जिंल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाच्या पत्राची प्रत सादर करत आहे दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here