Breaking

आता फार झाले पाचोरा पोलिसांनी कठोर भूमिका घेणे & पोलीसी भाषा दाखवणे गरजेचे वेळ प्रसंगी दोषी वर कठोर कारवाई करणे गरजे झाले आहे

0

पाचोरा – पोलिसांनी काय माहित कोण जाणे गेल्या तीन दिवसापासून फक्त बघ्याचे धोरण स्वीकारले आहे त्यामुळे कोणीही लॉक डाउन गांभीर्याने घ्यायला तयार नाही विशिष्ट वस्त्यांच्या बाहेर खुलेआम चहा- नास्त्याची दुकाने थाटली जात आहे आजचा सोबतचा फोटो आहे भंगार खरेदी करणारा चक्क देशमुखवाडी भागात श्रध्दा प्रोव्हीजन जवळ दिसुन आला ही पाचोरा शहरात आजची स्थिती आहे सत्य घटना ही AC कॅबीन मध्ये बसुन परिपत्रक- आदेश देणाऱ्यांना कळणार नाही ग्राऊंड लेव्हलला काय स्थिती आहे. हे फक्त स्थानीक शासकीय अधिकाऱ्यांनाच माहिती आहे पाचोरा पोलीसांनी गप्प राहण्याचे धोरण स्वतःच्या स्तरावर ? वरिष्ठांच्या आदेशावरून? की राजकीय दबावापोटी स्वीकारले? हे त्यांनाच माहीत आता जनतेच्या हितासाठी वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी, स्थानिक राजकीय मान्यवर पदाधिकाऱ्यांनी, स्पेशली या जिल्हयाचे पालक मंत्री मतदार संघांचे खासदार & आमदार यांनी पाचोरा पोलिसांना कठोर भूमिका घेणे बाबत & पोलीसी भाषा दाखवणे बाबत वेळ प्रसंगी दोषी वर कठोर कारवाई करणे बाबत आदेश देणे कर्तव्य बजावतांना एखादी चुक झाली तर त्यांच्या मागे देखील खंबीर पणे उभे राहणे गरजेचे आहे.कुंभकर्णी झोपेत असलेली पाचोरा ग्रामीण रुग्णालयाची यंत्रणा सर्व स्टाफ ने हजर & स्वच्छते सह 24×7 सक्रीय राहणे अत्यावश्यक झाले आहे अन्यथा परिस्थिती फार गंभीर निर्माण होणार आहे वरिष्ठांच्या आदेशांच्या भीतीपोटी पोलीस गप्प राहिले आपल्याला आजार होईल म्हणून आरोग्य प्रशासन गप्प राहिले तर काय चित्र असेल याची कल्पना सर्वांनी करणे गरजेचे आहे म्हणून पाचोरा शहर व परिसरातील नागरिकांनी सर्व जनतेच्या व आपल्या कुटुंबियांच्या हितासाठी आपल्या स्तरावरून ज्या शासकीय – राजकीय मान्यवरांना कठोर भूमिका करणे कामी असेल त्या मार्गाने संपर्क साधण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आज परिस्थिती आटोक्यात आहेत म्हणून वैद्यकीय उपचार करणारे काहीडॉक्टर व त्यांची यंत्रणादेखील कार्यरत आहे असे दिसते परंतु मुठभर लोकांनी ऐकले नाही म्हणुन उद्या जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर ते सुद्धा त्यांचा वैद्यकीय धर्मसोडून गेल्याशिवाय राहणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here