Breaking

स्मशानभुमीत नेणारे लाकडाचे ट्रॅक्टर अडवुन नामांकीत दैनिकाचे नांव सांगत खंडणीची मागणी ठेकेदार गुन्हा दाखल करण्याच्या पावित्र्यात

0

पाचोरा- येथील हिंदू स्मशानभूमीत न.पा.प्रशासना कडून विनामूल्य लाकूड उपलब्ध करून देण्यात येते सदरचे काम हे पूर्वीपासून न.पा. प्रशासना कडून ठेकेदारास देण्यात येते काल दिनांक 2 एप्रिल रोजी रात्री 8-30 वाजेच्या सुमारास पुनगाव रोडवर दैनिक सकाळच्या लोगो असलेल्या चार चाकी वाहनातून 3 जण उतरले आणि त्यांनी लाकडाने भरलेले ट्रॅक्टर अडवुन चौकशी करण्यास सुरुवात केली यावेळी सदरचा ठेकेदार जावेद शेख याने माझ्याकडे रीतसर परवानगी आहे किंबहुना सद्यस्थितीत लाकूड पुरवणे कामी अत्यावश्यक सेवा म्हणून मला न.पा. प्रशासनाच्यावतीने कार्ड देण्यात आलेले आहे तरी देखील मद्य अवस्थेतील या पत्रकार व त्याच्या सहकाऱ्यांनी वाद घालत आणि दहा हजार रुपयाची मागणी करू लागले सदरची मागणी पूर्ण न झाल्याने थेट स्मशानभूमी पर्यंत सदरचा पत्रकार व त्याचे सहकारी पोहोचले व तेथेही वाद घालु लागले परंतु तेथील जमलेल्या मुस्लिम समाजाच्या संतप्त लोकांनी हिंदू धर्म स्मशानभूमीत एवढे चांगले काम होत असताना त्यांच्या कडून काय पैसे मागतात असे सांग जेव्हा वातावरण संतप्त झाले तेव्हा तेथुन त्याने पळ काढला यावेळी पाचोरा येथील दै सकाळचे प्रतीनीधी प्रा.सी.एन. चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले की अशा प्रकारची गाडी व नाव असलेला व्यक्ती पाचोरा व पाचोरा परिसरात कोणीही दैनिक सकाळचा प्रतिनिधी नाही आपण थेट गुन्हा दाखल करू शकतात
अधिक माहिती घेतली असता सदरचा पत्रकार दैनिक सकाळचा नसून त्याने फक्त आपल्या फोरविलर व दैनिक सकाळचे स्टिकर लावले आहे आणि या प्रकरणी जावेद शेख यांची भेट घेतली असता प्रकरणी वरिष्ठांशी चर्चा करून व आमचे स्नेही व विधी तज्ञ ॲड अभय पाटील यांचा सल्ला घेऊन गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती जावेद शेख यांनी ध्येय न्युजशी बोलतांना दिली. फक्त या प्रकरणी जावेद यांचेवर राजकीय दबाव आणुन गुन्हा दाखल होणे पासुन थांबवण्यात येवु नये ही अपेक्षा ध्येय न्युज कडून व्यक्त केली जात आहे.कारण अशा पीत पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांमुळे चांगल्या पत्रकारांची देखील बदनामी होत आहे म्हणुन राजकीय व्यक्तींनी देखील जावेद च्या बाजुने उभे राहणे आवश्यक आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here