Breaking

पाचोरा नगरपरिषदे तर्फे कोरोना विषाणू पासून बचावासाठी स्‍वच्‍छता कर्मचा-यांना सुरक्षा साहित्‍य वाटप

0

पाचोरा- संपुर्ण राज्‍यात कोरोना विषाणू पसरत असून नगरपरिषद कर्मचारी दैनंदीन स्‍वरुपात शहरातील विविध भागात 3 फवारणी मशिन, ट्रॅक्‍टर्स, व लहान गल्‍ली बोळात जाण्‍यासाठी पाठीवरील फवारणी मशीनद्वारे कर्मचा-यांकडून फवारणी तसेच झाडू कामगारांकडून रस्‍ते सफाई व गटार कामगारांकडून गटार स्‍वच्‍छता प्राधान्‍याने करण्‍यात येत आहे. स्‍वच्‍छतेची कामे करीत असतांना कोरोना विषाणू पासून बचावासाठी नगरपरिषदेतर्फे कर्मचा-यांच्‍या सुरक्षेतला प्राधान्‍यक्रम देत दिनांक 16/04/2020 रोजी खराबदारीचा उपाय म्हणून महिला व पुरुष कर्मचा-यांना परिपुर्ण (PPE KIT) सुरक्षा किट वाटप करण्‍यात आली. यांत सॅनीटायझर, ग्‍लोज, मास्‍क, एप्रॉन, हॅड वॉश, बुट कव्‍हर, ओ.आर.एस.सॅचेट, कॉटन, साबण, बेन्‍झॉल, सोडीयम हायपोक्‍लोराईड, स्‍प्रे बॉटल, डोळयांच्‍या संरक्षणासाठी गॉगल, कॅप आदी साहित्‍यांचे वाटप सुमारे 225 कर्मचा-यांना करण्‍यात आले.
यावेळी उपस्थित कर्मचा-यांकडून या उपक्रमाचे स्‍वागत करण्‍यात येऊन त्‍यांनी प्रशासनाचे आभार मानत साहीत्‍य‍ स्विकारले. सदर वाटप प्रसंगी नगराध्यक्ष संजय गोहील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर, नगरसेवक राम केसवाणी, शितल सोमवंशी, वाल्मिक पाटील, रहेमान तडवी, लतीफ खान, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, आरोग्‍य निरीक्षक, कर निरीक्षक दगडू मराठे, भांडार विभागाचे ललित सोनार, राजेश कंडारे, नरेश आदिवाल, किशोर मराठे, राकेश मिश्रा आदी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here