Breaking

रेशनिंग वाटप संदर्भात खासदार- आमदार महोदयांनी शासकीय व रेशन संघटना स्थरावर नियोजन करणे महत्त्वाचे

0

रेशन माल घेण्यासाठी सर्वच रेशन दुकानांवर गर्दी उसळली आहे सुरक्षित अंतराचे तर बारा वाजले आहेत शिवाय कोणतेही शासकीय नियम व अटी यांचे पालन न करता नागरिक कोरोना सारख्या आजाराला गंभीरपणे घेण्यास तयार नाही तरी सुद्धा शासकीय स्तरावर व रेशन दुकानदार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बैठक घेऊन प्रत्येक रेशन दुकानदार त्याच्याकडे एका तासाला क्रमनिहाय वीस कार्ड धारक यानुसार नियोजन दिनांक ,वार ,वेळ याचे कूपन देण्यात आले व दुकाना बाहेर .फलक तसे लिहिण्यात आले तर निश्चितच ही गर्दी कमी होऊ शकते त्याच बरोबर रेशन मालकांनी प्रत्येक ग्राहकाला माक्स व सुरक्षित अंतर बंधन कारक केले तर शासनाचा उद्देश सफल होऊ शकतो तसेच ज्या ग्राहकाची रेशन संदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार असेल त्याचे तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रत्येक रेशन दुकानावर स्थानिक नगरसेवक एक सरपंच यासारख्या मान्यवरांसह त्यात महसूल विभागाची दोन कर्मचारी अशी तातडीने समीती बनवुन त्यांचे फलक तयार करून त्यावर त्यांचे नाव नंबर संपर्कासाठी दिले तर सर्व काही सुरळीत होऊ शकते व ग्राहकांना देखील घर-घर करावी लागणार नाही.

(या कल्पनेचे स्थानिक खासदार- आमदार महोदयांनी महसूल प्रशासन अधिकाऱ्यांचे समवेत योग्य ती चर्चा करून नियोजनाची अपेक्षा ध्येय न्युज मार्फत व्यक्त केली जात आहे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here