Breaking

कोरोना बाधित सह
कोरोनटाईन लोकांनासाठी आरोग्यदुत सरसावला होमीओपॅथी चा महाराष्ट्रात पहिला प्रयोग

पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्याने एकच भितीदायक वातावरण निर्माण झाले यातच कोरोना पॉझिटिव्ह आणि कोरोनटाईन लोकांनासाठी आरोग्यदुत सरसावला आहे. होमीओ पॅथी औषधी देण्यात येऊन त्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू, असुन महाराष्ट्रात पहीला प्रयोग करण्यात आला आहे शहरातील सारोळा रस्त्यावर वरील समर्थलॉन मंगल कार्यालयात कोरोनटाईन जवळपास ६२ जणांना करण्यात आले आहे तर दोन पॉझिटिव्ह जुने विघ्नहर्ता हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आले आहे या सर्वाची तब्बेत ठणठणीत असुन त्यातील जवळपास १८ लोकांनाचे निगेटिव्ह रिपोर्ट आल्याने त्यांना होमकोरांनटाईन करण्यासाठी घरी सोडण्यात येणार आहे. यातच आरोग्यदुत म्हणून ओळखले जाणारे कॉग्रेस आरोग्य सेवा सेल प्रदेश सरचिटणीस सचिन सोमवंशी यांनी तातडीने ओमसाई होमीपॅथी तर्फे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ज्या गोळ्या लागतात त्या कोरोना बाधित सह कोरोनटाईन ६४ लोकांना देण्यात आल्या. सदर च्या गोळ्यांचे पाकीट तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ यांच्या कार्यालयात डॉ. प्रशांत सांगळे, डॉ. रोहीत बोथरा, आरोग्यदुत सचिन सोमवंशी, यांच्या सह तहसीलदार कैलास चावडे उपस्थित होते यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ यांनी आभार मानले या गोळ्यांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल यापुढे ज्यांना ज्यांना ह्या गोळ्या लागतील त्यांना मोफत देण्याचा मानस होमीओ पॅथी डॉक्टरांच्या सहकार्याने सचिन सोमवंशी यांनी देण्याचा मानस बोलुन दाखवला*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here