Breaking

पाचोर्‍यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आ. गिरीष महाजनांनी प्रशासना कडून घेतला आढावा

पाचोरा -शहरात दिवसेंदिवस कोरोना कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव बघता मा.मंत्री आ.गिरीश महाजन यांनी आज पाचोरा येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आतापर्यंत शहरात 9 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले असून त्यावर प्रशासनाने उपाययोजना म्हणून केलेली तयारी आयसोलेशन वॉर्ड, अधिग्रहित केलेल्या रुग्णालय, पी.पी.ई.किट ची उपलब्धता सोबतच प्रतिबंधीत केलेले परिसर याबाबत सविस्तर आढावा घेतला.आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह महसूल व पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी बाबत यावेळी चर्चा करण्यात आली. या सर्व अडचणींसह केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर मा.मंत्री महाजन यांनी प्रशासनाच्या कामाचे कौतुक करून योग्य ती काळजी घेऊन अजुन उपाययोजनांवर भर द्यावी असे सांगितले,यावेळी पाचोरा प्रांताधिकारी यांनी माजी मंत्री महाजन यांच्या जी.एम. फाउंडेशनच्यावतीने मिळालेल्या पी.पी.ई. व सॅनिटाजर मिळाल्याने त्यांचे आभार मानले, तसेच कुठल्याही प्रकारच्या मदतीस यावेळी आ.महाजन यांनी प्रशासनाला आश्वासित केले. याप्रसंगी पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, उपविभागीय पोलिस अधिकारी काकडे साहेब,तहसीलदार कैलास चावडे,मुख्याधिकारी शोभा बाविस्कर मॅडम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ व वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here