‘मी महाराष्ट्राचीच’, प्रीतम मुंडेंच्या इंग्रजीतील प्रश्नाला स्मृती इराणींचं मराठीतून उत्तर

ताज्या बातम्या देश/विदेश

बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांच्या एका प्रश्नाला वस्त्रोद्योग मंत्री
स्मृती इराणी यांनी थेट मराठीत उत्तर देत लोकसभेत सर्वांचं लक्ष वेधून
घेतलं. प्रीतम मुंडे यांनी बीड जिल्हा व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त कापूस
ऊत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून विशेष मदत मिळावी अशी मागणी आज
संसदेत केली. यावर उत्तर देताना स्मृती इराणी यांनी मराठीत उत्तर देत मी
महाराष्ट्राचीच असल्याचं सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *