Breaking

आईच्या अंत्यसंस्कारासाठी आलेला इंडियन नेव्ही जवान लॉक डाऊन मुळे अडकल्याने विनामोबदला सेवा सुरू

भडगाव – सागर महाजन येथील महादेव गल्लीतील रहिवासी व मुंबई इंडियन नेव्ही तील जवान हनुमान वना पाटील यांच्या मातोश्री यांचे दि.22 मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ही वार्ता ऐकताच हनुमान पाटील मुंबई येथून भडगाव येथे आले. सर्व विधी आटोपल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने देशात लॉक डाऊन वाढले रेल्वे सेवा बंद असल्याने आपल्या मुख्यालय येथे जाता येत नसल्याने त्यांनी या कालावधीत भडगाव येथे विनमोबदला कार्य करुन याद्वारे देशसेवेत कार्य सुरुच ठेवणार आहेत.

शहरातील महादेव गल्ली रहिवासी हनुमान वना पाटील हे इंडियन नेव्ही मुंबई येथे कार्यरत असून लॉक डाऊन च्या अगोदर सुट्टी घेऊन गावाकडे आले कारण त्यांच्या मातोश्री यांचा वृद्धापकाळाने निधन झाले. नंतर अंत्यसंस्कार करून सुट्टिची मुदत संपली.या कलावधीतच कोरोणा चा प्रादुर्भाव वाढला आणि लॉक डाऊन वाढल्याने रेल्वे सेवा बंद झाल्या. यामुळे हनुमान पाटील याना आपल्या कर्तव्य वर जाता येत नसून घरी बसुन देशसेवेत कार्य मनात असताना घरात स्वस्थ बसू देत नव्हते म्हणुन त्यानी भडगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांना भेटले व मला विनामोबदला भडगाव येथे सेवा करण्याची संधी द्यावी. असे सांगितल्यानंतर पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी विनामोबदला रुजू होण्याची संधी त्यांना दिली. व ते सहा दिवसांपासून आपली दिउटी सुरळीत बजावत आहे. हनुमान पाटील हे अजून आईच्या दुःखातून सावरलेले नसून तरीदेखील कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघून त्यांनी जनतेला आवाहन करत म्हटले की, घरीच रहा सुरक्षित रहा. व कोरोनाला हद्दपार करा. ते जसे समुद्रावर लक्ष ठेऊन देशसेवा करतात तसेच ते आज भडगाव येथील बस स्थानक परिसरात सेवा बजावताना दिसून येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here