Breaking

मल्हार हॉस्पिटल & क्रिटिकल केअरचे संचालक डॉ. संकेत विसपुते यांनी विघ्नहर्ता हॉस्पिटल (कोरोना केअर सेंटर) मध्ये आज सेवा दिली सोबतच परीवाराची परंपरा कायम ठेवत एक अभिनव उपक्रम राबवला

पाचोरा-शहरातील पुर्वीचे मल्हार हॉस्पीटल म्हणजे स्व.डॉ. नथ्थुआप्पा & स्व. डॉ. शरदआबा यांच्या रूग्णसेवेतील औषधोपचारा सोबत गोड मायेच्या शब्दांचा ओलावाच रुग्णांचा अर्धा आजार हॉस्पिटल् मध्येच दुर करत विशेष बाब म्हणजे त्यांच्या हॉस्पीलला दाखल असलेल्या रुग्णांना दोन्ही वेळचे जेवणाचे ताट देखील स्वतःच्या घरातुन देत असत आज तीच परंपरा कायम ठेवत आजचे मल्हार हॉस्पीटल & क्रिटीकल केअरचे संचालक डॉ संकेत विसपुते कामकाज करीत असल्याचा अनुभव आज दिसुन आला घडले असे
मल्हार हॉस्पिटल & क्रिटिकल केअरचे संचालक डॉ. संकेत विसपुते यांनी देशमुखवाडी येथील विघनहर्ता हॉस्पिटल (कोरोना केअर सेंटर) मध्ये आज सेवा दिली. व ऍडमिट असलेले कोरोना रुग्णांना डॉ. संकेत विसपुते यांच्या तर्फे गोड बदामाचा शिऱ्यासह मिष्टान्न भोजन देऊन त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबवला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here