Breaking

Dhyeya News Special. (हम बोलेगा तो बोलते है बोलता है😷)
अत्यावश्यक सेवेची दुकाने सोडून इतर दुकाने पाचोऱ्यात कोणाच्या आशिर्वादाने सुरु आहेत

महाराष्ट्र जळगाव जिंल्हयातील पाचोरा शहरातील कोरोना बाधीत रुग्ण शासनाने ताब्यात घेतलेल्या हॉस्पीटल मधुन बाहेर फीरत असल्याची चर्चा सोशल मीडीयावर प्रसारीत झाली ही सर्व चर्चा वाचली असता जनहितार्थ सर्वांचे म्हणणे योग्य आहे परंतु मा.जिंल्हाधिकारी साहेब,SP साहेब ,पालकमंत्री यांच्या समोर स्वतःच्या कार्याचे कौतुक करून घेणारे संबधित अधिकारी फक्त बिले टाकणे & बिले काढणे यातच व्यस्त आहेत का? रूग्णांची सुरक्षा, वैद्यकीय सेवा देण्यासाठी तज्ञ व्यक्तीची टीम कुठे गेली & शासनाने ताब्यात घेतलेल्या देशमुख वाडी भागातील विग्धहर्ता हॉस्पीटल मध्ये कोरोना ग्रस्त रुग्णांना तेथे एवढया तापमानात साधे पंख्याच्या भरवश्यावर सोडून दिले तेथे दुपारच्या वेळी रुग्ण अक्षरशः तापमानाने त्रस्त होतांना दिसत आहे जो पर्यंत बापजी असलेले आमदार साहेबांचे नातेवाई पेशंट म्हणुन होते तोपर्यंत तेथे सर्व काही सुवीधा सह स्पेशल तहसीलदार साहेबांनी खाजगी डॉक्टरांना विशेष सक्तीचे आदेश काढुन 12/12 तासाच्या ड्युट्या लावल्या काल त्या रुग्णाचा डिश्चार्ज झाल्या नंतर ताब्यात घेतले हॉस्पीटल & पेशंट आज वाऱ्यावर सोडले असल्याचे दिसुन आले
जो पर्यंत सदर विग्धहर्ता हॉस्पीटल डॉ भुषणदादा मगर यांच्या ताब्यात होते तेव्हा स्वच्छता & इतर सर्व सुखसोई अति चांगल्या प्रकारे होत्या त्यांच्या ताब्यातुन प्रशासनाने घेताच त्या ठीकाणी अक्षरक्षः घाणीचे साम्राज्य आहे. वास्तविक पॉझीटिव्ह रूग्णांच्या कोरोना केअर सेंटर मध्ये व परिसरात नियमीत सफाई व फवारणी करणे हे न.पा. प्रशासनाचे काम आहे परंतु सदरच्या सेंटरकडे कोणतेही सफाई-फवारणीचे कर्मचारी सुध्दा या भागात फिरकत नाही.आतील बेडशिट इ. देखील जैसे थे असतात 24 तास सुरक्षा कर्मचारी देखील तेथे नियुक्त नाही लॉक डाऊन 31 मे पर्यंत वाढवल्या नंतर फक्त अत्यावश्यक व्यवसायीकांना परवानगी देण्यात आली असतांना शहरात सर्रास पणे आज बरीचशी अत्यावश्यक सेवेची दुकाने सोडून इतर दुकाने कोणाच्या आशिर्वादाने सुरु आहेत याकडे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी शोभा बावीस्कर यांनी लक्ष देणे महत्वाचे आहे & ही दुकाने सुरु असतांना त्याकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करणाऱ्या झारीतील शुक्राचार्याचा शोध घेणे महत्वाचे आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here