Breaking

शेतकऱ्यांना पिक कर्ज घेण्यासाठी घर – घर

पाचोरा- शेतकऱ्यांना सोसायटीकडून पिक कर्ज मिळते आहे  काहीं शेतकऱ्यांना ते  मिळाले देखील आहे मात्र मंजुर झालेले पिक कर्ज जे डी सी सी बँकेत क्रिडीट कर्ज खात्यांवर जमा झाले परंतु शेतकऱ्यांना ते पैसे काढण्यासाठी किसान क्रिडीट कार्ड घेऊन ए ८ी एम ला जावुन पैसे काढावे लागत आहे. मात्र यासाठी शेतकऱ्यांना पुढील समस्यांना तोंड द्यावे लागत आहे
१ ) जे डी सी सी बँकेचे जिल्ह्यात कोठेही ए टी एम नाही
२ ) आपला जिल्हा रेड झोन आहे
३ ) बऱ्याच ए टी एम मध्ये पैसे नसतात
४ ) एका दिवसाला ४० हजार रुपये काढता येतात त्यासाठी तालुक्याला ए टी एम शोधावे लागते
५ )ATM ठिकाणी कोणतेही सुरक्षीत अंतरचे पालन केले जात नसल्याने  कोरोना बाधित होण्याची भिती
६ ) इतर बँकाना ट्रान्झीकशन चार्ज द्यावे लागतात ते शेतकऱ्याच्या अकाऊंट मधून कट होतात
७) काढलेले पैसे आणण्याची रिस्क आहे

यासाठी
शेतकऱ्याच्या कोणत्याही  से०हींग अकाऊंटवर पैसे जमा केल्यास गरजेनुसार तो काढू शकेल त्यासाठी कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना स्थानिक बँकेत मिळणे गरजेचे आहे शिवाय
पैशांसाठी तालुक्याच्या बँकेत येणारी गर्दी देखील कमी होईल तरी सदर प्रकरणी बँक प्रशासनाने दखल घ्यावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here