Breaking

पाचोर्यातील फौजी बांधवांना कोरोना लढाईत टॅबलेट वाटप पुर्णत्वास

पाचोरा :- शहरातील पोलिसांच्या खाकी ला खांद्याला खांदा लावून काम करत असलेले सेवानिवृत्त फौजी यांना कॉग्रेस आरोग्य दुत आणि सत्यम होमीओपॅथीक क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने टॅबलेट चे वाटप पंधरा दिवसा पासुन केले देशाची सेवा बजावलेले माजी सेवानिवृत्त सैनिकांनी पुन्हा कोरोना लढाईत आपल्या गावातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीसांच्या खाकी ला खांद्याला खांदा लावून शहरातील विविध भागात कोरोना ग्रस्त असो की नसो कोणत्याही भागात जवळपास ७० हुन अधिक फौजी बांधव रस्त्यावर गस्त घालत असताना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी म्हणून शहरातील आरोग्यदुत कॉग्रेस आरोग्य सेवा सेल प्रदेश सरचिटणीस सचिन सोमवंशी यांनी घेऊन जवळपास पंधरा दिवसांत डॉ. रोहीत बोथरा यांच्या सत्यम होमीओपॅथीक क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करणार्‍या होमीओ पॅथी टॅबलेट मोफत देण्यात आले. यावेळी सेवा निवृत्त माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या सह सर्वच सैनिक हजर होते यावेळी कोरोना विषयी काय काळजी घ्यायची यावर होमीओ पॅथी तज्ञ डॉ. प्रशांत सांगळे, डॉ. रोहीत बोथरा, सचिन सोमवंशी यांनी मार्गदर्शन केले. कोरोना लढाईत जे योगदान माजी सैनिक देत आहे त्याची समाजमन दखल घेऊन काळजी घेतली त्या बद्दल माजी सैनिक संघटनेने आभार व्यक्त केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here