Breaking

अमोलभाऊ शिंदे यांच्या हस्ते होमिओपॅथीक औषधीचे वाटप

भारतीय जनता पार्टी पाचोरा-भडगाव यांच्या वतीने व बाजार समिती सभापती बापूसो.सतिष शिंदे यांच्या माध्यमातून आज कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये येणाऱ्या शेतकरी,व्यापारी, हमालमापाडी बांधव तसेच इतर सर्व नागरिकांना अमोलभाऊ शिंदे यांच्या हस्ते भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी शिफारस केलेले होमिओपॅथीक औषध आर्सेनिक अल्बम-३० चे वाटप करण्यात आले.सद्यस्थितीत हे औषध उपलब्धतेनुसार पाचोरा व भडगाव शहरातील प्रतिबंधित क्षेत्रामधील २५००० नागरिकांना वाटप होईल ह्या उद्देशाने मागविले असून येणाऱ्या काळात लवकरच पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील जवळपास एक लाख नागरिकांना होमिओपॅथीक औषध आर्सेनिक अल्बम-३० हे घरपोच वाटप करण्याचा मानस अमोलभाऊ शिंदे यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here