Breaking

सामाजिक कार्यकर्ते विशाल पाटील यांच्या हस्ते होमिपॅथिक गोळ्यांचे वाटप. (भडगाव-ब्युरोचिफ सागर महाजन & प्रतिनीधी माधव जगताप)

भडगाव – येथे सामाजिक कार्यकर्ते व संगम मित्र मंडळ चे अध्यक्ष विशाल वीरभांन पाटील व माऊली फौंडेशन यांच्या संयुक्ताने उज्ज्वल कॉलनी, महालक्ष्मी कॉलनी ,गुरुदत्त कॉलनी ,शिवशक्ती कॉलनी ,गणेश कॉलनी , शिवाजी नगर,जयहिंद कॉलनी ,गणेश कॉलनी या ठिकाणी रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे होमिओपॅथीक औषधाची वाटप करण्यात आले ,व नागरिकांना कोरोनाच्या प्रादुर्भाव पासून वाचण्यासाटी उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले विशाल पाटील (पप्पू दादा )हे नेहमी सामाजिक कार्यात मोठ्या हिम्मतीने नेहमी हजर राहतात ,भडंगांव शहरांत जसा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला व सर्व नागरिकांत भीतीचे वातावरण तयार झाले ,हे जेव्हा विशाल पाटील यांच्या निदेर्शनात आले तेव्हा त्यांनी ठरविले कि ,कोरोनाच्या लढ्यात खूपच उपयुक्त ठरलेल्या होमिओपॅथिक आर्सेनिक अल्बम 30 या औषधी चे विना मूल्य वाटप करणे व नागरिकांना योग्य सल्ला देणे हे कार्य विशाल पाटील यांनी मोठ्या प्रमाणात केले. यामुळे या परिसरातील नागरिकांनी आभार मानले.ह्या औषधी सहज उपलब्ध होत नसताना विशाल भाऊ यांनी मोठ्या जिकारी ने प्रयत्न करून ह्या औषधी उपलब्ध करून दिल्या म्हणून नागरिकांनी विशाल पाटील यांचे आभार मानले …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here