Breaking

पाचोऱ्यातील जनता कर्फ्यू सक्तीचा नाही :सचिन सोमवंशी  उद्या पासुन तीन दिवस – २९ / ३० / ३१ मे पर्यंत ज्या दुकानदार व व्यावसायिक यांना स्वयंस्फुर्तीने आपले उद्योग-दुकान-व्यवसाय बंद ठेवायचे असतील ते बंद ठेऊ शकतात. ( आ.किशोरआप्पा पाटील)

पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील आता कुठे दुकाने उघडायला लागली त्यात लगेच जनता कर्फ्यू ची घोषणा केली खरे मात्र हा शासकीय कर्फ्यू नाही त्यामुळे दुकानदार आवश्यक वाटल्यास उघडु शकता असे कॉग्रेस चे सचिन सोमवंशी यांनी स्पष्ट केले आहे. *कोरोना हे जरी जागतिक पातळीवर संकट असले तरी त्याच्या बरोबर किमान दोन वर्षे आपल्याला राहावेच लागेल यात शंका नाही. कोरोना ला शोशल डीस्टन हेच महत्वाचे आहे. पाचोरा शहरातील कोरोना मुळे लॉकडाउन अचानक सुरू झाले शहरातील नगर परिषद ने रिक्षा फिरवुन बंद ची घोषणा केली त्यानंतर अनेकांना जनता कर्फ्यू ची घोषणा केल्या यात कुणीही बोलले नाही कारण जनता भयभीत होती. लहान लहान दुकानदार यांचे मात्र या दोन महिन्यात खुप हाल झाले. जेव्हा जिल्हाधिकारी यांनी लॉकडाउन शिथील केले तेव्हा नगर परिषद ने रिक्षा फिरवुन दुकानदारांना आपले व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणे गरजेचे होते तेव्हा मात्र उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनीच खरे मार्गदर्शन करुन लॉकडाउन शिथील ची माहीती देऊन लहान लहान दुकानदार यांना सकाळी ९ ते ५ दुकाने उघडण्यास सांगितले तर शहरातील १२ हॉटेल मालकांना पार्सल सुविधा ची परवानगी दिली यावेळी सचिन सोमवंशी यांनी मदत केली*. *पाचोरा शहर कोरोना मुक्त कडे वाटचाल करीत आहे त्यातच पुन्हा दोन पॉझिटिव्ह सापडले आहेत हे पुढेही काही प्रमाणात सुरू राहणार आहे यात शंका नाही. त्यामुळे कोरोना साठी नुसते बंद करणे जनता कर्फ्यू लावणे म्हणजे लहान लहान दुकानदारांवर अन्याय आहे. मागील कर्फ्यू च्या काळात शहरातील प्रत्येक प्रभागात फवारी होणे नागरिकांनांची तपासणी होणे गरजेचे होते मात्र नगर परिषद ने किंवा वैद्यकीय विभागाने असे केले नाही. जेव्हा साथीच्या कायद्याच्या अंमलबजावणी सुरू होते तेव्हा प्रशासनाने कडे सर्वस्व जबाबदार असते त्यामुळे प्रशासनाने चे जबाबदार अधिकारी यांनी हा जनता कर्फ्यू असुन आमचा नाही त्यामुळे कोणत्याही पोलीस किंवा तत्सम अधिकारी या दरम्यान कोणत्याही दुकानदारास त्रास देणार नाही याचा खुलासा केला आहे. त्यामुळे नागरिकांनी जर आपणास खरोखर काम असेल तरच घराबाहेर पडावे आणि शोशल डीस्टन चे भान ठेवावे तसेच तोंडावर मास लावावा कारण अजून आपल्या सभोवताली कोरोना आहे याची जाणीव तोडांवरचा मासच आपणास देतो असे श्री सोमवंशी यांनी शेवटी म्हटले आहे. जनता कर्फ्यू दरम्यान दुकानदार ची इच्छा महत्त्वाची आहे सक्ती नाही कारण अनेक लहान व्यापारी यांची परीस्थिती बिकट झाली आहे भाड्याच्या दुकाने माणसांचा पगार याही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत

उद्या पासुन तीन दिवस – २९ / ३० / ३१ मे पर्यंत ज्या दुकानदार व व्यावसायिक यांना स्वयंस्फुर्तीने आपले उद्योग-दुकान-व्यवसाय बंद ठेवायचे असतील ते बंद ठेऊ शकतात.
ज्यांना आपले व्यवसाय व दुकाने विहीत ठरवुन दिलेले वेळेत सुरू ठेवायचे असतील ते सुरु ठेऊ शकतात.
कुणावरही सक्ती नाही त्यामुळे हा निर्णय शहरातील नागरीकांनी व दुकानदार व व्यापारी बांधवांनी स्वयं-स्फुर्तीने स्वत: घ्यायचा आहे.त्यात प्रशासनाचे व आमचे कुठल्याही प्रकारची सक्ती असणार नाही असे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगीतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here