Breaking

नानासाहेब संजय वाघ यांचे हस्ते भडगांव येथे अर्सेनिक् गोळ्या व सुरक्षा मास्क वाटप

भडगांव – पाचोरा नगर पालीका राष्ट्रवादी कॉग्रेसचे गटनेते तथा पा.ता.सह शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांचे हस्ते भडगांव येथे यशाश्विनी सामाजिक अभियान अंतर्गत राष्ट्रवादी महिलाध्यक्षा नगरसेविका योजनाताई पाटील यांचे मार्फत अर्सेनिक् गोळ्या व सुरक्षा मास्क वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष श्यामदादा भोसले,शेतकरी संघाचे मा.अध्यक्ष संजयराव पाटील,
वि का.सो.मा.चेअरमन नानासो.धर्मराज भोसले,ओबीसी सेल ता.अध्य्क्ष डॉ.अमृत पाटील,युवा नेते कुणाल पाटील, पत्रकार नितिन पाटील,निंबा पाटील,नरेंद्र भोसले,शरद पाटील,डी.डी.पाटील आदि मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी उपस्थीतांकडून नगरसेविका योजनाताई पाटील यांच्या सेवा व कार्याचे कौतुक करण्यात आले या प्रसंगी काळजी घ्या.सुरक्षित रहा असे आवाहनही नानासो.संजय वाघ यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here