Breaking

शासनाच्या धान्य लाभा पासून वंचित लाभार्थींचे त्वरित सर्वेक्षण करून त्यांना लाभ मिळवा – प्रशांत पवार (भडगाव-ब्युरोचिफ सागर महाजन & प्रतिनीधी माधव जगताप)

भडगाव :- तालुक्यातील अनेक रेशन कार्ड धारकांना मोफत अथवा कमी दराने धान्य मिळत नाही त्यांना विविध अडचणी येतात स्वस्थ धान्य दुकानदार लाभार्थीना वंचित ठेवत प्रशासन दुकानदारा कडे व दुकानदार प्रशासनाकडे बोट दाखवत आहे.यात लाभार्थी मात्र वंचित राहत आहेत. शासनाच्या धान्य लाभा पासून वंचित लाभार्थींचे त्वरित सर्वेक्षण करून त्यांना लाभ मिळवा या मागणीसाठी तहसिलदार माधुरी आंधळे यांना माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार यांनी निवेदन दिले . भडगाव शहरातील व तालुक्यातील अनेक रेशन कार्ड धारकांना मोफत अथवा कमी दराने धान्य मिळत नाही त्यांना विविध अडचणी येतात. डिजिटल नोंद सापडत नाही, थम मशीन बंद , ठसा उमटत नाही, विभक्त ,कार्ड ची नोंद मिळत नाही. याशिवाय रेशन दुकानदार ग्राहकांची विविध करणे देऊन पिळवणूक करतात . ग्राहकांना लाभा पासून वंचित ठेवतात. लाभार्थीना नीट लाभ मिळत नसल्याने ते लवकरात लवकर मिळावे यादी मागणींसाठी आज दि 4 रोजी तहसीलदार माधुरी आंधळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार, रेशन ग्राहक संघर्ष समिती शहर अध्यक्ष विवेक पवार , जितेंद्र पवार, मुकुंदा महाजन उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here