Breaking

मे. सुप्रिम कोर्टाने पाचोरा पिपल्स माजी चेअरमन अशोक संघवी यांचा जामीन फेटाळला

पाचोरा पिपल्स बँक प्रकरणी ध्येय न्युज संपादक संदीप महाजन यांच्या फिर्यादी वरून पाचोरा पिपल्स बँक माजी चेअरमन अशोक संघवी यांच्यासह इतरांवर गु. रं.नं 271/2019 पाचोरा पो. स्टे. ला दि. 11/ 7 /2019 रोजी ( मध्यरात्री म्हणजेच सकाळी 2.45 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला या संदर्भात आरोपीनी मे.जळगाव जिंल्हा सत्र न्यायालयात & मे.उच्च न्यायालयात अटक पुर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला असता तो नामंजुर करण्यात आला या प्रकरणी आरोपीने मे.सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे अटक पुर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला असता सदरचा अटकपुर्व जामीनीचा अर्ज 3 सदस्यीय बॅच समोर 2/6/2020 रोजी सुनवणीला आला असता मे. सुप्रीम कोर्टाने खालच्या कोर्टाचे निर्णय कायम ठेवत त्या निर्णयात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप न करण्याचा निर्णय देत आरोपी चे वय लक्षात घेता त्यांना सद्दस्थितीचा विचार करून दि.2/6/2020 पासुन पुढील चार आठवडे अटके पासुन संरक्षण दिले आहे अखेर आरोपींना अखेर आता पाचोरा पो. स्टे.ला हजर व्हावे लागणार आहे
या महत्त्वपुर्ण प्रकरणाचा तपास पाचोरा पो. स्टे.चे पोलीस निरीक्षक अनिल शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. डी.एम.नलावडे साहेब करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here