Breaking

पाचोरा- भडगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची आढावा बैठक

0

पाचोरा भडगाव मतदार संघाची तातडीची आढावा बैठक दि. 07-12-2019 वार शनिवार रोजी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या अध्यक्षतेखाली दु. 3 वाजता प्रसाद हॉल पाचोरा येथे आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 12 डिसेंबर रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे नियोजन करणे,तसेच ओल्या दुष्काळी परिस्थिती संदर्भात, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या आढावा व पक्ष संघटनेविषयी महत्त्वाची चर्चा करण्यात येणार आहे. तरी पाचोरा -भडगाव तालुक्यातील सर्व आजी माजी जि.प.,प.स. सदस्य, मार्केट कमिटी संचालक,शेतकी संघ संचालक, नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे पाचोरा-भडगाव राष्ट्रवादी कॉग्रेस तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here