Breaking

पाचोरा पोलीसांवर कारवाई व गटबाजीच्या धोरणामुळे पोलीसांमध्ये असहकार चळवळ तर गुन्हेगार व चोरटयांना रान मोकळे

0

पाचोरा पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांवर कीरकोळ असंबधीत अर्जावर पोलीसांची चौकशी & त्यांच्यावर खात्याअंतर्गत होणाऱ्या कारवाई मुळे गेल्या सहा महीन्या पासुन गुन्हेगार व चोरटयांवरील दहशत संपुष्टात आली आहे. पोलीस नको त्या वादात अडकू नये या धाकाने गुन्हेगारांना पोलीसी झटका दाखवण्यास मागे राहत आहे. पाचोरा पोलीस निरीक्षक अनिल शिंदेसाहेब & डी.वाय.एस.पी. ईश्वर कातकाडे साहेब यांच्यातील शित युध्दाचे बळी पोलीस कर्मचारी ठरणे सुरु झाले असुन आणखी 6-7 कर्मचारी रडावर असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. तर दुसऱ्या बाजुला दर १-२ दिवसाआड चोरटे घरफोडी करुन पोलीसांच्या असहकार- अकुशल कर्तुत्वास सलामी देत आहे. सदर प्रकरणी शासकीय & सन्मानीय लोकप्रतीनिधीनी वरीष्ठ पातळीवरुन दखल घेण्यात यावी अशी अपेक्षा ध्येय न्युज च्या वतीने करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here