Breaking

आरोग्य दुत सचिन दादा सोमवंशी यांनी वाचविले प्राण

0

ाचोरा – भडगांव ते पाचोरा रस्त्यावर स्विफ्ट गाडीने जोरदार धडक देऊन मेडिकल मालकाला गंभीर जखमी करून स्विफ्ट चालक फरार झाला आहे

पाचोरा शहरातील बनोटीवाला फार्म हाऊस पुढे भडगांव कडुन मोटरबाईक वर भडगांव येथील महाजन मेडिकल चे संचालक ऋषिकेश संभाजी महाजन (२१) हा पाचोरा येथे घरी येताना बनोटीवाला फार्म हाऊस पुढे पाचोर्याकडुन भडगांव कडे जाणार्‍या भरधाव वेगात असलेली पांढर्‍या रंगाची स्विफ्ट गाडीने जोरदार धडक दिली यात ऋषिकेश महाजन गंभीर जखमी झाला जखमी अवस्थेत पारोळा येथील कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल पवन पाटील अॅब्लुलन्स चालक निलु पाटील यांनी विग्नहर्ता मल्टीस्पेशल हॉस्पिटल मध्ये उपचार साठी भर्ती केले असता डॉ. भुषण मगर, डॉ. संदीप इंगळे, डॉ. सचिन वाघ, डॉ. किरण मगर, डॉ. जितेश पाटील, डॉ. सदानंद वाणी, अंबिका घोष यांनी तात्काळ प्रथमोपचार केले असता डोक्यात कवटी फुटल्याने कॉग्रेस चे आरोग्यदुत सचिन सोमवंशी यांनी तातडीने औरंगाबाद हलविण्याचा निर्णय घेतल्याने औरंगाबाद येथील एम्स हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत

वाढदिवसाच्या दिवशी अपघात*

ज्या दिवशी अपघात झाला त्याचदिवशी ऋषिकेश महाजन याचा वाढदिवस होतो त्याचे वडील डॉ. संभाजी महाजन आणि कॉलनीतील रहीवाशी हे केक कापण्यासाठी वाट बघत असतांनाच त्याच्या अपघाताचे वृत्त पोहचताच सर्वांनी हॉस्पिटल कडे धाव घेतली. औरंगाबाद येथे ऋषिकेश महाजन याची मृत्यूशी झुंज सुरू असुन पोलिसांनी मोटारसायकल जप्त केली आहे तर स्विफ्ट कार चा शोध सुरू आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here