Breaking

*कासोदा येथे प्रगती बहुउद्देशीय संस्थेकडून विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न –

0

कासोदा (राहूल मराठे) येथील प्रगती बहुउद्देशीय संस्था यांच्याकडून दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ रोजी संविधान दिनानिमित्त निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत उत्कृष्ट यश संपादन केले . अशा विद्यार्थ्यांचा दि. २७ डिसेंबर २०२९ शुक्रवार रोजी गुणगौरव सोहळा क.नं.मंत्री विद्यालयाच्या प्रांगणात प्रगती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन जि. प.अध्यक्षा सौ. उज्वला पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष करण मंत्री शाळेचे मुख्याध्यापक पी एस पाटील सर होते याप्रसंगी मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून अमोल चिमणराव पाटील पारोळा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती , राजेंद्र सोनवणे आर.पी.आय. जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक भुसावळ , गावातील जेष्ठ नागरिक केशवशेठ सोनार , नूरुद्दिन मुल्लाजी , सावंत सर , प्रशांत पाटील ,सरपंच उमेश पाटील , यु.टी. महाजन सर , सरिता मंत्री , सुरेखा पाटील मॅडम , परिसरातील सर्वच शाळेतील मुख्याध्यापक , साप्ताहिक विचार वैभव व प्रगती बहुउद्देशीय संस्थेचे व आर.पि. आय चे पदाधिकारी उपस्थित होते . मान्यवरांचे शाल – श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . निबंध स्पर्धेतील विध्यार्थ्यांमध्ये २ गट करण्यात आले होते . यात पहिल्या गटातून प्रथम क्रमांक दिपाली आण्णा चौधरी इ.७ वी प्राथमिक आश्रम शाळा कासोदा , द्वितीय क्रमांक सानिया बानो शेख रशीद ए.टी.डी. उर्दू हायस्कूल कासोदा , तृतीय क्रमांक रोशनी राजेंद्र पाटील इ.७ वी साधना मा. विद्यालय कासोदा . तर दुसऱ्या ८ वी ते १० वी गटातून प्रथम क्रमांक मानसी जगदीश मराठे इयत्ता १० वी कं.नं. मंत्री विद्यालय कासोदा , द्वितीय क्रमांक मयुर संजय चौधरी , इयत्ता १०वी भारती विद्यामंदिर कासोदा , तृतीय क्रमांक अभिषेक सूनील उशीर इयत्ता ९ वी सार्वजनिक माध्यमिक विद्यालय कासोदा . तर उत्तेजनार्थ दोन्हीं गटातील विद्यार्थी विद्यार्थिनींना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले . कार्यक्रमाप्रसंगी देवेंद्र बेहेरे , गजानन पाटील , महेंद्र मोरे , रवींद्र चौधरी , भैरवलाल पांडे, शाकीर सर , मन्सूर पठाण , संजय येवले , अनिल मंत्री , तथा परिसरातील सर्वच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक – शिक्षिका , विद्यार्थी – विद्यार्थिनी व आदी मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोरसे सर यांनी केले तर प्रास्ताविक गौतम सोनवणे सर यांनी मांडले व आभार संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बाविस्कर यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here