Breaking

पंचायत समितीचा सभापती म्हणजे जनता व शासनाचा दुवा -खासदार उन्मेश दादा पाटील

0

चाळीसगाव — माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात त्रिसूत्रीचा अवलंब केल्याने केंद्रात आणि राज्यातील योजना गावपातळीवर राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारी पंचायत समिती अस्तित्वात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून योजना राबविणारी त्रीसुत्री मधून विकास तळागाळापर्यंत पोहचवला गेला. यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पंचायत समितीचे नेतृत्व देखील तेवढेच तोलामोलाचे हवे यासाठी जातीपातीच्या पलीकडे जाऊन राज्यातली पहिली शिंपी समाजाच्या स्मितल बोरसेंना संधी दिली. त्यांनी चौफेर उल्लेखनीय कामगिरी केली. कारण पंचायत समितीचे सभापतीची भूमिका “ऑलराऊंडर” असली तर तालुक्यात विकासाची प्रक्रिया गतिमान होते असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालय आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या स्टॅण्डिंग
कमेटीची सदस्य तथा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केले आहे ते चाळीसगाव पंचायत समिती सभागृहामध्ये सर्व माजी सभापती च्या प्रतिमा अनावरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलत होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार उन्मेष दादा पाटील प्रमुख अतिथी आमदार मंगेश दादा चव्हाण, माजी मंत्री एम के अण्णा पाटील, तालुका अध्यक्ष के बी दादा साळुंखे, भाऊसाहेब जाधव, पतीग बापू पाटील उपस्थित होते,

अतिशय प्रेरणा दायी कार्यक्रम सभापती स्मितल बोरसे व सर्व पंचायत समिती सदस्य यांच्या प्रयत्नांने घेण्यात आला 1962ते 2019 पर्यंत कार्यरत सर्व पक्षीय माजी सभापती यांचे प्रतिमा अनावरण लावण्यात आले. आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी आपल्या मनोगत मध्ये सांगितले की सर्व तालुक्यातील प्रमुख व जेष्ठ पदाधिकारी यांची भेट झाली त्यांच्या कार्यकाळ मधील अनेक अविस्मरणीय प्रसंग मनोगत मध्ये ऐकण्या साठी मिळाले हे माझे परम भाग्य आसल्याचे म्हणाले.

प्रतिमा अनावरण मार्गदर्शक ठरावे.

खासदार उन्मेष दादा यांनी सांगितले की आज अनोखा योग पंचायत समिती ने घडवून आणला पूर्वी ज़िल्हा परिषद मधून सभापती होण्याची पद्दत होती तसेच अनेक वेळा गट तट असताना सुद्धा या पदावर विराजमान होण्याचे सौभाग्य अनेकांना लाभले सलग तेरा वर्ष सभापती असलेले मोरे तात्या ते पंचायत समितीच्या राजकारणात अधिक वर्षे प्रतिनिधित्व करणारे स्व सुधीर दादा सोनवणे घराणे तसेच कळवंतराव भाऊसाहेब यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. सभागृहातील प्रतिमा भावी पिढीला मार्गदर्शक ठराव्यात अशी भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या शुभहस्ते व उपस्थित मान्यवरांचे हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला

लीलाताई पाटील, शशीकला ताई सोनवणे, ऍड.आर एल नाना पाटील, बाबुलाल मोरे, लीलाताई संभाजी पाटील, शिवाजी आमले साहेब, विजय जाधव , ईश्वरसिंग ठाकरे, साहेबराव चव्हाण स्व.सूर्यभान घोडे , संजूतात्या पाटील, अभयदादा सोनवणे , निर्मलाताई पाटील, यांचे सह सर्व माजी सभापती व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री दिनेश बोरसे यांनी केले आभार प्रदर्शन सभापती स्मितल दिनेश बोरसे यांनी केले.
मनोगत के बी साळुंखे, संजू तात्या पाटील, विजय जाधव, आर एल पाटील, अभय सोनावणे, ईश्वर ठाकरे यांनी केले पंचायत समिती सदस्य अजय पाटील, सुरेखा साळुंखे, माया ताई पाटील, वंदना मोरे, प्रीतीताई चकोर, सुनीता ताई पाटील, भाऊसाहेब केदार ,सुनील पाटील, भारती पाटील, शिवाजी सोनावणे लताताई दौंड उपस्थित होते.पंचायत समितीचे अधिकारी व सर्व कर्मचारी बंधूनी सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here