Breaking

राष्ट्रीय फुटबॉलपटू धनश्री महाजन हिचा खासदार उन्मेश दादा & अनिल महाजन यांच्या हस्ते गौरव

0

चाळीसगाव — बहाळची फुटबॉलपटू धनश्री हिने चंदीगड येथे राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत दैदित्यमान यश संपादन करीत गोल्डमेडल पटकावले.तिचा आज खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला. पंचायत समितीचे माजी सदस्य माळी समाजाचे जेष्ठ नेते जगन महाजन यांच्या कडील कौटुंबिक कार्यक्रमात हजारो समाजबांधव आप्तेष्ट यांच्या उपस्थितीत केंद्रीय पेट्रोलियम, प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म ,लघु, मध्यम उद्योग मंत्रालय स्टँडिंग कमिटी सदस्य तथा जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते धनश्री महाजन हीचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माळी समाजाचे जेष्ठ मान्यवर सर्वश्री अनिल महाजन , अशोक बापू खलाणे, उद्धवराव महाजन सर ,भिमराव नाना खलाणे,उपसभापती संजय पाटील, दिनेश दादा बोरसे, जगन अप्पा महाजन,प स सदस्य कै ची पाटील, सुनील पाटील, पियुष साळुंखे, नरेंन काका जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here